आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती आली तिने पाहिले आणि तिने जिंकले... रेखाची एन्ट्री होताच वळल्या होत्या सगळ्यांच्या नजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः 5 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. यावेळी दीर्घ काळानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार रेखा संसदेत पोहोचल्या होत्या. रेखा यांची संसदेत एन्ट्री होताच सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी यावेळी प्रत्येकजण उत्सुक दिसले. रेड कलरचे लिपस्टिक, मोकळे सोडलेले केस आणि क्रिम कलरच्या साडीत रेखा अतिशय सुंदर दिसल्या. विशेष म्हणजे रेखा यांनी परिधान केलेल्या साडीवरील कमळाच्या फुलांवरून अनेकांनी अनेक अर्थ काढले. 

राजीव शुक्ला झाले ट्रोल...  
रेखा यांची एन्ट्री होताच काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांच्यासह अनेक नेते त्यांच्याडे पाहत असलेले फोटो व्हायरल झाले. रेखासोबत फोटो काढण्याचा मोह समाजवादी पार्टीच्या नेत्या खासदार डिंपल यादव यांनाही आवरता आला नाही. रेखा यांच्यामागे उभे असलेले राजीव शुक्ला त्यांना हसत न्याहाळताचे फोटोज व्हायरल झाल्यापासून ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. एका नेटिझनने सोशल मीडियावर पोस्ट केले, "रेखा जी की साड़ी पर कमल के छपे फूलों को देखकर कांग्रेसी नेता राजीव शुक्ला अपनी खिसियानी और झेंप को रोकते हुये.."  
 
पुढे बघा, रेखा यांचा एव्हरग्रीन अंदाज खास फोटोजमधून... 
बातम्या आणखी आहेत...