आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day Spl: आई-वडिलांच्या लग्नापूर्वीच झाला होता रेखाचा जन्म, वडिलांचे होते चार स्त्रियांसोबत संबंध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी रेखाचा आज वाढदिवस आहे. गेल्याच महिन्यात रेखाची ऑटोबायोग्राफी 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' प्रकाशित झाली. या पुस्तकाच्या माध्यमातून रेखाच्या आयुष्यातील अनेक रहस्यांवरुन पडदा उचलला गेला. तसे पाहता, यापूर्वीसुद्धा रेखाविषयी अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. उदाहरणार्थ रेखाचा जन्म होईपर्यंत तिच्या आईवडिलांचे लग्न झालेच नव्हते. याशिवाय तिच्या वडिलांचे तिच्या आईशिवाय आणखी चार महिलांसोबत संबंध होते. रेखाला एक सख्खी तर पाच सावत्र बहिणी आहेत. शिवाय एक भाऊदेखील आहे. रेखा यांच्या कुटुंबीयांविषयी कुणाला फारशी माहिती नाही. जाणून घेऊयात रेखाच्या कुटुंबीयांविषयी..
तामिळ स्टारची मुलगी आहे रेखा
10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास (आता चेन्नई) मध्ये जन्मलेली रेखा ही तामिळ स्टार जेमिनी गणेशन यांची कन्या आहे. रेखाशिवाय जेमिनी यांना एकुण सात मुलेमुली (6 मुली आणि 1 मुलगा) आहे. त्यांची नावे विजया चामुंडेश्वरी, सतीश कुमार, राधा उस्मान सैयद, रेवती स्वामीनाथन, कमला सेल्वराज, नारायणी गणेश आणि जया श्रीधर अशी आहेत.
रेखाच्या जन्मानंतर झाले होते आईवडिलांचे लग्न
रेखाच्या मातोश्री पुष्पावल्ली या प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री होत्या. त्यांनी जेमिनी गणेशन यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केले होते. याच काळात दोघांचे अफेअर सुरु झाले. रेखा ही त्यांची अनौरस संतती आहे. रेखाच्या जन्माच्यावेळी जेमिनी गणेशन आणि पुष्पावल्ली यांचे लग्न झाले नव्हते. कित्येक वर्षे जेमिनी यांनी रेखाला आपली मुलगी असल्याचे मान्य केले नव्हते. काही वर्षांनी जेमिनी आणि पुष्पावल्ली यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांच्या दुस-या मुलीचा राधा उस्मान सैयदचा जन्म झाला. अर्थातच रेखाला एक सख्खी बहीण आहे.
जेमिनी गणेशन यांचे चार स्त्रियांसोबत होते संबंध
जेमिनी गणेशन यांच्या आयुष्यात चार स्त्रिया आल्या होत्या. 1940 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी त्यांचे लग्न अलामेलूसोबत झाले होते. असे म्हटले जाते, की अलामेलू या त्यांच्या एकमेव कायदेशीररित्या पत्नी आहेत. त्यानंतर त्यांचे अभिनेत्री पुष्पावल्ली, सावित्री आणि जुलियाना यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. बातम्यांनुसार, जुलियाना त्यांच्यापेक्षा वयाने 36 वर्षे लहान होती.
पहिली पत्नी अलामेलू यांच्यापासून जेमिनी यांना चार मुलगी झाल्या. रेवती, कमला, जयलक्ष्मी या तीन मुली डॉक्टर आहेत, तर नारायणी ही मुलगी पत्रकार आहे. पुष्पावल्ली यांच्यापासून त्यांना दोन मुली झाल्या, त्यापैकी रेखा ही अभिनेत्री आहेत, तर राधा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली. दुसरी पत्नी सावित्रीपासून जेमिनी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी विजया चामुंडेश्वरी फिजिओथेरपिस्ट असून मुलगा सतीश कुमार परदेशात स्थायिक झाला आहे.
रेखाच्या लग्नावर सस्पेन्स..
1973 मध्ये रेखाचे अफेअर बॉलिवूड अभिनेता विनोद मेहरासोबत होते. असे म्हटले जाते, की दोघांनी लग्न केले होते. मात्र आजवर याचा खुलासा झालेला नाही. रेखाने एका मुलाखतीत लग्नाची बातमी अफवा असून विनोद मेहरा चांगला मित्र असल्याचे म्हटले होते. विनोद मेहराव्यतिरिक्त अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे रेखाचे अफेअर चांगलेच गाजले होते. 1990मध्ये रेखाने दिल्लीस्थित बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न केले होते. मात्र फार काळ हे लग्न टिकले नाही. रेखा लंडनमध्ये असताना मुकेश अग्रवाल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात, आपल्या मृत्यूस कुणासही जबाबदार धरु नये, असे त्यांनी लिहिले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रेखाच्या कुटुंबीयांची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...