आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा 15 वर्षांच्या रेखाला बळजबरी केले Kiss, लोक वाजवत होते शिट्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अनजाना सफर' मधील सीनसाठी रेखाला Kiss करताना विश्वजित. - Divya Marathi
'अनजाना सफर' मधील सीनसाठी रेखाला Kiss करताना विश्वजित.
मुंबई - रेखाची ऑटोबायोग्राफी 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' नुकतीच लाँच झाली आहे. यासेर उस्मान यांच्या या पुस्तकात रेखा यांच्या जीवनाबाबत अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्या पहिल्या Kiss चा उल्लेखही या ऑटोबायोग्राफीमध्ये करण्यात आला आहे. वयाच्या 15 व्या वर्षी हा किस सीन त्यांनी दिला होता. अॅक्टर विश्वजित त्यावेळी 5 मिनिटे रेखा यांना बळजबरी Kiss करत होते असा यात उल्लेख आहे.

काय आहे प्रकरण..
1969 च्या 'अनजाना सफर' चित्रपटातील हा किस्सा आहे. मेहबूब स्टूडियो, मुंबईमध्ये राजा नवाथे यांच्या दिग्दर्शनात चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. पहिल्या शेड्युल्डमध्ये कुलजित पाल, राजा आणि विश्वजीत यांवी रेखासाठी एक प्लॅन तयार केला. त्यादिवशी रेखा आणि विश्वजित यांच्यात एक रोमँटिक सीन शूट होणार होता. डायरेक्टर राजा नवाथे यांनी अॅक्शन म्हणताच विश्वजित यांनी रेखाला मिठीत घ्यायला सुरुवात केली आणि Kiss करू लागले.

रेखा एकदम आवाक् झाल्या होत्या. याबाबत त्यांना सांगण्यात आले नव्हते. कॅमेरा रोल होत होता पण डायरेक्टरने कट म्हटले नाही आणि विश्वजित यांनीही Kiss करणे बंद केले नाही. पूर्ण पाच मिनिट ते रेखा यांना Kiss करत होते. यादरम्यान त्याठिकाणी असलेले युनिट मेंबर्स शिट्या वाजवत चीअर करत होते. रेखा यांचे डोळे बंद होते पण त्यांचे अश्रू स्पष्ट दिसत होते.

काय म्हणाले विश्वजित
विश्वजीत यांनी त्यांच्या या Kiss सीन वर स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, यात त्यांची काहीही चूक नाही. त्यांनी डायरेक्टर राजा नवाथे यांच्या म्हणण्यावरून तसे केले होते. यानंतर रेखा आणि विश्वजित यांचे नाव जोडले जाऊ लागले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, तरुणपणातील रेखाचे काही PHOTOS
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...