मुंबई- दीपिका पदुकोण यावेळी व्हॅलेंटाइन डे रणवीर सिंहसोबत सेलिब्रेट करणार आहे. हा स्पेशल दिवस आपल्या लव्हलेडीसोबत सेलिब्रेट करण्यासाठी रणवीर टोरंटोला पोहोचला आहे. दीपिका येथे 'XXX' या हॉलिवूड सिनेमाचे शूटिंग करत आहे. सध्या रणवीर आणि दीपिकाची लव्हस्टोरी टॉक ऑफ द टाऊन बनलेली आहे. मात्र, एकेकाळी दीपिकाचे नाव निहार पांड्यासोबत जुळले होते.
निहारसोबत लिव्ह-इनमध्ये राहिली आहे दीपिका...
मॉडेलिंगच्या दिवसांत दीपिकाचे अफेअर निहार पांड्यासोबत होते. दोघांनी भेट अॅक्टिंग स्कूलमध्ये झाली होती. एकेकाळी हे कपल लिव्ह-इनमध्ये राहत होते. मात्र रणबीर कपूरसोबत वाढत्या जवळीकमुळे दीपिकाने निहारसोबत ब्रेकअप केले. निहारशिवाय दीपिकाचे नाव सिद्धार्थ माल्या, महेंद्र सिंह धोनी, युवराज सिंह, रणबीर कपूरसोबत जुळले आहे. सध्या ती 'बाजीराव मस्तानी' सिनेमातील को-स्टार रणवीर सिंहला डेट करतेय.
दीपिकाशिवाय प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा, कंगना रनोट, अलिया भट संघर्षाच्या काळात कुणाला ना कुणाला डेट करत होत्या. मात्र यश पदरात पडल्यानंतर त्यांनी पहिल्या प्रेमाला दूर केले.
स्टार्सच्या पहिल्या प्रेमाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...