Home »Gossip» Remember Ashiq Banaya Aapne Actress Tanushree Dutta Is In US

7 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे ही अॅक्ट्रेस, बहिणीने सांगितले या शॉकिंग लूकचे रहस्य

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 13:06 PM IST

  • तनुश्री दत्ता
'आशिक बनया आपने'ची अॅक्ट्रेस तनुश्री दत्ता तुम्हाला आठवते का? जर आठवत नेसल तर आम्ही तुम्हाला सांगतो, की 2004 मध्ये मिस यूनिव्हर्सचा ताज जिंकल्यानंतर तनुश्री दत्ताने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. 2005 मध्ये तिचा पहिला चित्रपट आला होता 'आशिक बनाया आपने'. यामध्ये तनुश्रीने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. फिल्म यशस्वी देखील ठरली होती, मात्र तनुश्रीचे करिअर काही सफल राहिले नाही. रुपेरी पडद्यावर ती शेवटची दिसली ती 2010 मध्ये प्रदर्शित 'अपार्टमेंट'मध्ये. चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर 2012 मध्ये तिचे एक बोल्ड फोटोशूट समोर आले होते. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. गेल्या 7 वर्षांपासून तनुश्री फिल्म आणि ग्लॅम वर्ल्डपासून दूर यूएसमध्ये आहे.
'फिरंगी'मधून डेब्यू करणारी तनुश्रीची बहिण इशिताने सांगितले बहिणीबद्दल..
तनुश्रीने टक्कल का केले होते, या प्रश्नाच्या उत्तरात इशिताने सांगितले, की हिमालय परिक्रमेदरम्यान तिने डोक्यावरील केस काढले होते. परिक्रमा केल्यानंतर ती कैलाश मान सरोवर आणि लडाख येथे गेली होती.
- इशिताने सांगितले, की तिची बहिण मनाने अतिशय निर्मळ आहे. लोक काय म्हणतील याची ती काळजी करत नाही, तिला जे वाटते ते ती करते.

Next Article

Recommended