आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Remember Naina’S Brother Shiv Aka Athit Naik From Kal Ho Na Ho... THIS Is How He Looks Now!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

13 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'कल हो ना हो'मधला हा चिमुकला आठवतोय का तुम्हाला!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः सुपरस्टार शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान स्टारर 'कल हो ना हो' सिनेमा रिलीज होऊन नुकतीच 13 वर्षे उलटली आहेत. निखिल अडवाणी दिग्दर्शित हा सिनेमा 28 नोव्हेंबर 2003ला रिलीज झाला होता. सिनेमात शाहरुख, प्रिती आणि सैफशिवाय सोनाली बेंद्रे, सतीश शाह, सुषमा सेठ, राजपाल यादव, रीमा लागू, सिमोन सिंह आणि शोमा आनंद या स्टार्सच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सगळ्यांसोबतच सिनेमात दोन बालकलाकार झळकले होते. अथित नाईक आणि झनक शुक्ला ही त्या बालकलाकारांची नावे. या बारा वर्षांत हे दोन बालकलाकार तरुण झाले असून स्वतःची छाप सोडण्यासाठी धडपडत आहेत.
कल हो ना हो या सिनेमात अथितने प्रीती झिंटाचा धाकटा भाऊ शिवची भूमिका वठवली होती. हाच चिमुकला अथित नाईक आता 12 वर्षांनंतर कसा दिसतो, तो कोणत्या क्षेत्रात काम करतोय, याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला या खास पॅकेजमध्ये देतोय.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अथितविषयी बरेच काही आणि सोबतच पाहा त्याची लेटेस्ट छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...