Home »Gossip» Remembering Amjad Khan On His Birth Anniversary: Life Facts About Him

या प्रसिद्ध बॉलिवूड व्हिलनने केले होते स्वतःच्या मृत्यूचे भाकीत, अपघातात तुटली होती 13 हाडे

दिव्य मराठी वेब टीम | Nov 12, 2017, 13:15 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये 'गब्बर सिंह' नावाने प्रसिद्ध असलेल्या अमजद खान यांची आज 77 वी बर्थ अॅनिवर्सरी आहे. त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1940 रोजी पेशावर येथे झाला होता. त्यांनी अनेक नकारात्मक तसेच काही सकारात्मक भूमिकाही केल्या. अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेल्या अमजद यांचे करिअर एका अपघाताने पूर्ण बदलून गेले. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जेव्हा ते गोव्याला जात होतो तेव्हा त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यामुळे त्यांच्या शरीराचे 13 हाडे तुटली होती. यानंतर ते बराच काळ चित्रपटांपासून दूर राहीले... 5 मिनिटात निघून जाईल..

अमजद खान यांच्या पत्नीने एका मुलाखतीत सांगितले की, नेहमीप्रमाणे दिवस होता. "संध्याकाली 7 वाजता अमजद यांना कोणालातरी भेटायचे होते असे सांगून कपडे चेंज करायस गेले त्वाह माझा मुलगा पळत आला आणि वडिलांचे शरीर थंड पडले आहे असे सांगितले. जाऊन पाहिले तर अमजद खान बेशुद्ध झाले होते आणि काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला." शैला खान यांनी सांगितले की, अमजद नेहमी म्हणायचे, "मी 5 मिनिटातच जग सोडून निघून जाईल आणि कोणाला माझी सेवा करण्याचे कष्ट देणार नाही. आणि झालेही असेच." 27 जुलै 1992 रोजी त्यांनी जगाला अलविदा केला.
पुढच्या स्लाईडवर वाचा, अमजद यांच्याशी निगडीत काही खास गोष्टी..

Next Article

Recommended