आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 रुपये घेऊन बॉलिवूडमध्ये हिरो बनण्यासाठी आले होते देव आनंद, हार्ट अॅटॅकने झाला मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एव्हरग्रीन अभिनेता देव आनंद यांची आज सहावी डेथ अॅनिवर्सरी आहे. देव आनंद यांचा मृत्यू 3 डिसेंबर 2011 साली लंडन येथे हार्ट अॅटॅकने आला होता. त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला अनेक काही किस्से ऐकायला मिळतात पण त्यातील काही किस्से असेही आहेत जे फार कमी लोकांना माहीत आहे. आज त्यांच्या डेथ अॅनिवर्सरीनिमित्त आज त्यांच्याबद्दल काही खास गोष्टींची माहिती खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 30 रुपये घेऊन हिरो बनण्यासाठी आले होते देव आनंद...

 

ग्रॅज्युएशन करताना देव आनंद यांना पुढचे शिक्षणही घ्यायचे होते पण त्यांच्या वडिलांनी पुढे शिकायचे असेल तर नोकरी कर असे त्यांना सांगितले. येथूनच त्यांचा बॉलिवूड प्रवास सुरु झाला. 1943 साली ते मुंबईत आले त्यावेळी त्यांच्याकडे केवळ 30 रुपये होते आणि राहायलाही जागा नव्हती. देव आनंद यांनी रेल्वे स्टेशनजवळच एक खोली भाड्याने घेतली त्यात तीन लोक राहत होते. ते तिघेसुद्धा चित्रपटांत करिअर करण्यासाठी आले होते. देव आनंद यांचे खरे नाव धर्मदेव पिरोशीमल आनंद आहे. 


देव आनंद यांना दोन भाऊ होते.  चेतन आनंद, विजय आनंद आणि एक बहीण शील कांता. शील कांता जर्नलिस्ट होती. तिचे लग्न डॉ. कुलभूषण कपूर यांच्यासोबत झाले होते. त्यांचाच मुलगा शेखर कपूर जे आता डायरेक्टर आहेत. त्यांना दोन मुली आहेत नीलू आणि अरुणा. नीलू यांचे लग्न अभिनेता नवीन निश्चलसोबत झाले तर अरुणाचे लग्न अभिनेता परिक्षीत साहनीसोबत झाले. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, देव आनंद यांच्याबद्दल काही खास Facts...

बातम्या आणखी आहेत...