आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशुतोष राणांसोबत रेणुकाने थाटला दुसरा संसार, आईवडिलांनी नव्हे नणंदेने केले होते कन्यादान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. आपल्या मनमोहक हास्याने चाहत्यांना भूरळ घालणारी ही अभिनेत्री आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. 7 ऑक्टोबर 1966 रोजी महाराष्ट्रात रेणुका शहाणेचा जन्म झाला.

मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये आर्ट्स या विषयात पदवी प्राप्त केलेल्या रेणुकाने 1992 मध्ये 'हाच सुनबाईचा भाऊ' या मराठी सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती 1993 ते 2001 या काळात दुरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'सुरभी' या कार्यक्रमाने. सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या सुत्रसंचलनाने बहरलेला हा कार्यक्रम खूप यशस्वी ठरला होता. त्यानंतर 1994 मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन' या सिनेमातील भूमिकेने रेणुकाच्या लोकप्रियतेत वाढ केली. या सिनेमानंतर मुलगी, बहीण, बायको, सून, वहिनी असावी तर ती अगदी रेणुकासारखीच असे प्रत्येकाला वाटू लागले.
काही सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर रेणुकाने अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत लग्न करुन अभिनयाला काही काळासाठी रामराम ठोकला होता. ब-याच वर्षांनी रेणुका पुन्हा इंडस्ट्रीत परतली आहे. मात्र आशुतोष यांच्यासोबतचे रेणुकाचे हे दुसरे लग्न असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का?

आज रेणुका यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये वाचा, आशुतोष आणि रेणुका यांच्या लव्हस्टोरीविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...