आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Funny : सिनेमांच्या शीर्षकांमध्ये 'मॅगी'चा उल्लेख करुन सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बस्स दो मिनिट'च्या जाहिरातीद्वारे घराघरांत पोहोचलेल्या मॅगी नूडल्सचे नमुने सदोष आढळल्याने अनेक ठिकाणी या उत्पादनाच्या विक्रीवर बंदी आली आहे. 'मॅगी' नूडल्समध्ये शिसे आणि एमएसजी हे चव वाढवणारे मात्र, शरीरास घातक असणारे पदार्थ आढळून आले आहेत. त्यामुळे मॅगीची जाहिरात करणाऱ्या अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटाविरोधात बिहारच्या मुजफ्फरपूर न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'टेस्ट भी, हेल्थ भी' अशी टॅग लाईन मिरवत दोन मिनिटांत तयार होणाऱ्या 'मॅगी'चं 'कटू सत्य' जगासमोर आल्यानंतर सोशल मीडियावर मॅगी ट्रेंडिंगमध्ये आहे. ट्विटरवर #ReplaceMovieNameWithMaggi ट्रेन्ड करत आहे. हिंदी सिनेमांच्या शीर्षकांमध्ये मॅगी शब्द टाकून मजेशीर शीर्षक तयार झाले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा सिनेमांचे फनी शीर्षक...