आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reports Claims That Salman Khan Engaged With Iulia Vantur

OMG...सलमान खानने \'गर्लफ्रेंड\' लुलिया वेंचूरसोबत गुपचुप केला साखरपुडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान आणि लुलिया - Divya Marathi
सलमान खान आणि लुलिया

मुंबईः सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा लग्नाच्या बातम्यांनी चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे ही बातमी भारतातून नव्हे तर चक्क परदेशातून अर्थातच रोमानियातून आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुखारेस्ट (रोमानिया) लुलिया वेंचूरच्या पीआरने दावा केला आहे, की सुपरस्टार सलमान खानसोबत लुलियाचा साखरपुडा झाला असून पुढील वर्षी दोघे लग्नगाठीत अडकतील. रोमानियात सध्या दोघांच्या साखरपुड्याची चर्चा होता आहे. सलमानच्या सूत्रांनी मात्र ही बातमी केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.
खरं तर गेल्यावर्षी अर्पिता खानच्या लग्नात लुलिया सहभागी झाली होती. त्यावेळी सलमानने तिची भेट आपल्या कुटुंबीयांशी घालून दिली होती. तेव्हासुद्धा दोघांच्या लग्नाची चर्चा झाली होती. आता या बातमीत किती तथ्य आहे, हे येणा-या दिवसांतच कळेल.
रोमानियाची रहिवासी आहे लुलिया-
सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वेंचूर रोमानियाची रहिवासी असून ती मॉडेल आणि टीव्ही होस्ट आहे. 2006मध्ये लुलियाने टीव्हीकडे वाटचाल केली. तिने PRO टीव्हीसाठी मॉर्निंग शो होस्ट केला. तसेच आठवड्याच्या शेवट्या दिवशी मॉर्निंग न्यूज अँकर होती. तसेच वर्षातील एका मोठ्या इव्हेंटची होस्टसुध्दा असायची.
लुलियाने स्टीफन बनीकासोबत डान्सिंग प्रोग्रामसुध्दा केला आहे. ती स्पोर्ट्सची समर्थकसुध्दा आहे. ती लहान असताना हॉलीबॉल खेळत होती. तिने टेनिस, बास्केटबॉलसुध्दा खेळले आहे. तिने मागील वर्षी 'ओ तेरी' सिनेमात एक आयटम नंबरसुध्दा केला आहे. या सिनेमाची सलमानचा भावोजी अतुल अग्नीहोत्रीने निर्मिती केली होती.
विवाहित आहे लुलिया वेंचूर-
लुलियाचे लग्न रोमचा मारियस मोगासोबत झाले आहे. मारियस मोगा गीतकार, गायक आणि निर्माता आहे. तो यूरोपमध्ये राहतो. लुलिया आणि मारियसचे लग्न 7 ऑगस्ट 2012मध्ये झाले होते. बातम्यांनुसार, दोघांचे दीर्घकाळापासून नाते आहे. दोघांच्या रोमान्सच्या बातम्या त्यांच्या शहरांतील वर्तमानपत्रांच्या हेडलाइन असतात. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर दोघे विवाहित असल्याचेदेखील घोषित झालेले आहे. फेसबुकवर 7 ऑगस्ट 2012ला जो फोटो पोस्ट झाला आहे, त्यामध्ये दोघे लिप-लॉक करताना दिसत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लुलियाची सलमानच्या कुटुंबीय आणि पतीसोबतची खास छायाचित्रे...