आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reports Claims That Salman Khan Engaged With Iulia Vantur

\'\'सलमानचा साखरपुडा झालाच नाही, अफवांवर विश्वास ठेऊ नका\'\', जाणून घ्या हे कुणी म्हटलंय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लूलिया वेंचूरच्या या फोटोनंतर सलमान आणि तिच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर आल्या.)
मुंबई- सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा आपल्या लग्नाविषयी चर्चेत आला आहे. यावेळी ही चर्चा भारतातून नव्हे तर रोमानियामधून सुरु झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुखारेस्ट (रोमानिया)मध्ये लुलिया वेंचूरच्या पीआरने दावा केला आहे, की तिने सुपरस्टार सलमान खानसोबत साखरपुडा केला आहे आणि पुढील वर्षी लग्नगाठीत अडकणार आहेत. मात्र अलिकडेच सलमानची बहीण अर्पिता खानने या चर्चांचे खंडन केले आहे. तिने सांगितले, की विविध वर्तमानपत्र आणि वेबसाइट्सवर आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. तिने टि्वटरवर पोस्ट केले, 'Do not believe everything you read in the papers or on different websites online.'.
एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले जात आहे, की सध्या संपूर्ण रोमानियामध्ये सलमान आणि लुलियाच्या गुपचुप साखरपुडा केल्याची चर्चा चालू आहे. याच वर्षी मेमध्ये बातमी आली होती, की सलमानने कथित गर्लफ्रेंड लुलियासोबत लग्न करण्याचा विचार केला आणि यावर्षीच्या अखेर दोघांचे लग्न होऊ शकते. मात्र सलमानच्या सूत्रांनी याला केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे.
कशी सुरु झाली चर्चा-
सलमान आणि लुलिया यांच्या साखरपुड्याची बातमी रोमानियाच्या www.wowbiz.ro या वेबसाइटवर आली. या साइटवर लुलियाचा एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये लुलियाच्या हाताच्या बोटात अंगठी दिसत आहे. या अंगठीच्या आधारावर तिच्या आणि सलमानच्या साखरपुड्याची चर्चा सुरु झाली.
अर्पिताच्या लग्नावेळी आली होती बातमी-
मागील वर्षी हैदराबादमध्ये सलमानची धाकटी बहीण अर्पिताच्या लग्न झाले. त्यावेळीसुध्दा बातम्यांना उधाण आले होते, की त्याने लुलियाला आपल्या कुटुंबियांना भेटवले. शिवाय, एका इव्हेंटदरम्यान स्वत: सलमानने स्वीकार केले होते, की तो 2015पर्यंत त्याला लग्न करायचे आहे.
रोमानियाची रहिवासी आहे लुलिया-
सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वेंचूर रोमानियाची रहिवासी असून ती मॉडेल आणि टीव्ही होस्ट आहे. 2006मध्ये लुलियाने टीव्हीकडे वाटचाल केली. तिने PRO टीव्हीसाठी मॉर्निंग शो होस्ट केला. तसेच आठवड्याच्या शेवट्या दिवशी मॉर्निंग न्यूज अँकर होती. तसेच वर्षातील एका मोठ्या इव्हेंटची होस्टसुध्दा असायची.
लुलियाने स्टीफन बनीकासोबत डान्सिंग प्रोग्रामसुध्दा केला आहे. ती स्पोर्ट्सची समर्थकसुध्दा आहे. ती लहान असताना हॉलीबॉल खेळत होती. तिने टेनिस, बास्केटबॉलसुध्दा खेळले आहे. तिने मागील वर्षी 'ओ तेरी' सिनेमात एक आयटम नंबरसुध्दा केला आहे. या सिनेमाची सलमानचा भावोजी अतुल अग्नीहोत्रीने निर्मिती केली होती.
विवाहित आहे लुलिया वेंचूर-
लुलियाचे लग्न रोमचा मारियस मोगासोबत झाले आहे. मारियस मोगा गीतकार, गायक आणि निर्माता आहे. तो यूरोपमध्ये राहतो. लुलिया आणि मारियसचे लग्न 7 ऑगस्ट 2012मध्ये झाले होते. बातम्यांनुसार, दोघांचे दीर्घकाळापासून नाते आहे. दोघांच्या रोमान्सच्या बातम्या त्यांच्या शहरांतील वर्तमानपत्रांच्या हेडलाइन असतात. सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर दोघे विवाहित असल्याचेदेखील घोषित झालेले आहे. फेसबुकवर 7 ऑगस्ट 2012ला जो फोटो पोस्ट झाला आहे, त्यामध्ये दोघे लिप-लॉक करताना दिसत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लुलिया-सलमानच्या साखरपुड्याचा दावा करणा-या वेबसाइटचे प्रिन्ट शॉट आणि लुलियाचे सलमानच्या कुटुंबिय आणि पतीसोबतचे काही फोटो...