आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Revealed: Shahid Kapoor’S Wedding Ceremony’S Menu And Guest List!

शाहिदच्या लग्नात असेल शाकाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल, पाहुण्यांची नावे झाली उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः शाहिद कपूर आणि मीरा राजपूत)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीची तरुणी मीरा राजपूत यांच्या लग्नाला आता अवघा एक महिना शिल्लक आहे. 10 जुलै रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकणार आहेत. यांच्या लग्नात शाकाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल राहणार असल्याची ताजी बातमी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात पाहुण्यांना शाकाहारी पदार्थ वाढण्याचा निर्णय शाहिद शाकाहारी असल्यामुळे नव्हे तर वर आणि वधूच्या पालकांनी मिळून घेतला आहे. दोन्ही कुटुंब राधा स्वामी सत्संग व्यासचे अनुयायी आहेत. लग्नात त्यांचे गुरुसुद्धा सहभागी होणार आहेत. त्यामुळे लग्नात शाकाहारी पदार्थ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिसेप्शनमध्ये असेल दोन्ही प्रकारचे जेवण
शाहिद आणि मीराचे लग्न खासगी समारंभ असणारेय. या लग्नात कुटुंबीय आणि शाहिद-मीराचे निवडक मित्र सहभागी होणार आहेत. मात्र लग्नानंतर बॉलिवूडमधील सेलिब्रिटींसाठी रिसेप्शन पार्टी देण्यात येणार आहे. या रिसेप्शनमध्ये शाकाहारी आणि मासांहारी जेवण ठेवण्यात येणार आहे.
पाहुण्यांची नावे झाली उघड
आता बोलुयात, शाहिदच्या लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांविषयी. बातमी आहे, की लग्नात बॉलिवूडमधून विशाल भारद्वाज, कुणाल कोहली, विकास बहल आणि निर्माते मधु मंतेना सहभागी होणार आहेत. अद्याप फायनल लिस्ट आलेली नाही.
मीरापेक्षा वयाने 11 वर्षे मोठा आहे शाहिद
शाहिद आणि मीराचा साखरपुडा यावर्षी 14 जानेवारीला झाला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मीराचे वय 23 वर्षे आहे. तर शाहिदने वयाची 34 वर्षे पूर्ण केली आहेत. अर्थातच मीरा शाहिदपेक्षा तब्बल 11 वर्षांनी लहान आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मीरा राजपूतची निवडक छायाचित्रे...