आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Watch Video: शाहरुखसोबत सेल्फी काढायची होती फॅनची इच्छा, पण घडले काही भलतेच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा एक मोठा चाहता वर्ग आहे. मुंबईतील मन्नत या बंगल्याच्या बाहेर आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक छोटीशी झलक बघण्यासाठी चाहते गर्दी करत असतात. भारतातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडेसुद्धा एसआरकेचे चाहते आहेत. परदेशातसुद्धा शाहरुखची एक झलक बघण्यासाठी त्याचे चाहते आतुर असतात. सध्या शाहरुख इम्तियाज अलीच्या आगामी 'द रिंग' या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने तुर्कीमध्ये होता. शाहरुख आपल्या शहरात शूटिंग करत असल्याचे समजल्यानंतर त्याला भेटण्याची संधी चाहते कशी दवडतील बरं... म्हणूनच शूटिंगस्थळी मोठ्या संख्येने शाहरुखचे चाहते जमा झाले होते. साहजिकच यावेळी चाहत्यांची शाहरुखसोबत फोटो आणि सेल्फी काढण्याची इच्छा असणार हे काही वेगळे सांगायला नको.
शाहरुख येताच चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी, हात मिळवण्यासाठी पुढे सरसावले. एका चाहत्याने तर चक्क शाहरुखचा हात पकडला. हा चाहता त्याचा हात सोडायला काही तयार नव्हता. शाहरुखने कसाबसा आपला हात सोडवला. थोडा पुढे जात नाही तोच एक चाहता तर चक्क शाहरुखच्या गळ्यात पडून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र शाहरुख त्याला धक्का देत पुढे निघून गेला. या चाहत्याने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. इतकेच नाही तर या व्हिडिओला या चाहत्याने 'कल हो ना हो' या सिनेमाच्या टायटल ट्रॅकची ट्युनदेखील लावली आहे. व्हिडिओच्या शेवटी हा तरुण खिन्न झालेला दिसतोय. एकंदरीतच काय तर आपल्या लाडक्या अभिनेत्यासोबतच सेल्फी काढण्याची या तरुणाची इच्छा अपुरी राहिली हेच खरं...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, शाहरुखच्या डायहार्ट फॅनची कशी झाली अवस्था...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...