आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषी कपूर रमले जुन्या आठवणीत, ट्विट केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रीना रॉयसोबत अभिनेते ऋषी कपूर)
मुंबईः सततच्या टीकेमुळे दुःखी झालेल्या ऋषी कपूर यांनी ट्विटरला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्यांनी आपला निर्णय बदलल्याचे दिसून येते. ऋषी कपूर सध्या ट्विटरवर अॅक्टिव असून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
अलीकडेच ऋषी कपूर यांनी आपले एक जुने छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. यामध्ये ते अभिनेत्री रीना रॉयसोबत बोल्ड अंदाजात दिसत आहेत. हे छायाचित्र बारुद या सिनेमातील आहे. छायाचित्रात ते टी-शर्ट आणि यलो स्विमिंग शॉर्ट्समध्ये तर रीना रॉय बिकिनीत दिसत आहे.
या छायाचित्रासोबत ऋषी यांनी ट्विट केले, “WOOHHAA!!! I am scandalised to see me. How dare I do this???Someone sent it to me। Ahh! That's Reena Roy,in the film Barood!”
पुढील स्लाईडसमध्ये पाहा ऋषी कपूर यांनी शेअर केलेले आणखी एक जुने छायाचित्र...