आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rishi Kapoor Shares Picture With Meenakshi Sheshadri

GUESS : ऋषी कपूर यांनी ओळखलेच नाही या अभिनेत्रीला, अनेक सिनेमांमध्ये एकत्र केलंय काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबत दिसणा-या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंय का. खरं तर हिला बघताच ऋषी यांनाही काही क्षण तिची ओळख पटली नव्हती. चला तर मग तुमची उत्सुकता जास्त जाणून न धरता आम्ही तुम्हाला सांगतो ही अभिनेत्री आहे तरी कोण? ही आहे अभिनेत्री मिनाषी शेषाद्री. अचंबित झालात ना... अहो ऋषी कपूरसुद्धा हिला बघताच अचंबित झाले होते.
मिनाक्षी शेषाद्रीने चित्रपटसृष्टीला रामराठ ठोकून एक काळ लोटला आहे. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. ब-याच काळाने ती मुंबईत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचली होती. या कार्यक्रमात ऋषी कपूरसुद्धा सहभागी झाले होते. त्यावेळी मिनाक्षी काही क्षण त्यांनी ओळखलेच नाही. मात्र नंतर त्यांना तिची ओळख पटली.
मिनाक्षीच्या चेह-यावर वाढत्या वयाचा मुळीच प्रभाव दिसून येत नाहीये. ती पूर्वी इतकीत तरुण आणि ग्रेसफुल दिसतेय.
ऋषी कपूर यांनी मिनाक्षीसोबतचे एक छायाचित्र आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करुन ट्विट केले, ''Any guesses who this is? I didn't recognise her for a moment. What a lovely surprise. Name in 30 mins no hints.''
या ट्विटनंतर अर्ध्या तासाने त्यांनी पुन्हा एक ट्विट केले, ''99% got it right. Meenakshi Sheshadhari as always whenever in Mumbai pays us a visit unannounced.Looking gorgeous!.''
ऋषी कपूर आणि मिनाक्षी शेषाद्री यांनी 'साधना', 'घर परिवार', 'अपना घर', 'बडे घर की बेटी'सह बरेच सिनेमे एकत्र केले आहेत. या दोघांची प्रमुख भूमिका असलेला 1993 मध्ये रिलीज झालेला 'दामिनी' हा सिनेमा खूप गाजला होता.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ऋषी कपूर यांनी केलेले ट्विट्स...