आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Riteish And Genelia Deshmukh‘s Son Riaan Is Celebrating His First Birthday Today

Riaan’s 1st Birthday: रितेश-जेनेलियाच्या गोंडस चिमुकल्याचे पाहा खास फोटोज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेनेलियाने आपल्या फेसबुक पेजवर रिआनचे हे फोटोज शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. - Divya Marathi
जेनेलियाने आपल्या फेसबुक पेजवर रिआनचे हे फोटोज शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई- बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. याचे कारण म्हणजे त्यांचा चिमुकला मुलगा रिआन याचा आज पहिला वाढदिवस आहे. गेल्यावर्षी 25 नोव्हेंबरला जेनेलिया आणि रितेशच्या घरी रिआनचे आगमन झाले. या खास दिवसाच्या निमित्ताने आई जेनेलियाने आपल्या चिमुकल्याची खास छायाचित्रे शेअर करुन लिहिले, ''Thank You Riaan for making me a mom.. Thank you my baby for making our lives special.. Happy Birthday My Baby''
रितेश आणि जेनेलिया आपल्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर नेहमीच क्यूट रिआनची छायाचित्रे शेअर करत असतात. इतकेच नाही तर अनेक इव्हेंट्समध्येही रिआन त्यांच्यासोबत दिसत असतो. अलीकडेच ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्याच्या बर्थडे पार्टीत रिआन आपल्या आईवडिलांसोबत दिसला होता.
आज रिआनच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याची अगदी जन्मापासून ते आत्तापर्यंतची खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे रितेश आणि जेनेलियाच्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरुन घेण्यात आली आहेत...
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, क्यूट रिआनची लक्ष वेधून घेणारी छायाचित्रे आणि सोबतच रिआनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेनेलियाने केलेले ट्विट्स....