आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेशच्या रिआनच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, मीटिंगच्या निमित्ताने करायचे डेटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मातृत्वाचा आनंद घेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख (5 ऑगस्ट) आज 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर जेनेलियाला चाहत्यांच्या शुभेच्छा येत आहेत. तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुखने यानेही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दोघांचा एक सुंदर सेल्फी पोस्ट केला आहे. रितेशने हॅपी बर्थडे रिआनची आई... असे म्हटले आहे. रितेशने ट्विट केले, ''Happy Birthday Riaan chi AAI - @geneliad - you are my best friend & my greatest strength. Thank u for being u.''
जेनेलियाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात एका गोंडस मुलाला जन्म दिला. या क्यूट कपलने आपल्या बाळाचे नाव रिआन असे ठेवले आहे. विशेष म्हणजे रितेशने गेल्यावर्षी जेनेलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ''हॅपी बर्थडे बायको..'' असा उल्लेख केला होता आणि आता रिआनच्या जन्मानंतर ''रिआनच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा'' असे म्हटले आहे.
रितेश आणि जेनेलिया बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांनी लग्नापर्यंत आपली लव्हस्टोरी जगापासून लपवून ठेवली होती.
आज आम्ही तुम्हाला सांगतोय, या क्यूट कपलच्या लव्हस्टोरीविषयी...
बातम्या आणखी आहेत...