आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy Families: रितेश-जेनेलियाने आत्तापासूनच केलंय मुलाच्या लग्नाचं प्लानिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 21 जून रोजी फादर्स डे मोठ्या उत्साहात देशात साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमध्ये सेलिब्रिटीही मागे राहिले नाहीत. या खास दिवसाच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने मुलगा रिआनसोबतचे एक खास छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. या छायाचित्रात दिवंगत विलासराव देशमुख यांचे छायाचित्र दिसत आहे. जेव्हापासून त्याला मुलगा झाला आहे, तेव्हापासून रितेश किती आनंदात आहे हे त्याच्या नेहमीच्या पोस्टवरून कळतंच.
वडील झाल्यानंतर रितेशने सांगितले, ''जेव्हापासून रिआनचा जन्म झालाय, तेव्हापासून माझ्या प्रत्येक बोलण्यात त्याचा उल्लेख आवर्जुन असतो. जेव्हा फराह खान आई झाली होती, तेव्हा ती तिच्या मुलांची मोबाइलमधील छायाचित्रे आम्हाला नेहमी दाखवायची. आज माझ्या फोनमध्येसुद्धा रिआनची भरपूर छायाचित्रे तुम्हाला बघायला मिळतील. माझ्या बोलण्यात रिआनच्या खाण्यापिण्यापासून ते झोपेपर्यंतच्या सर्व सवयींचा आवर्जुन उल्लेख असतो. इतकेच नाही तर जेनेलिया आणि मी रिआनचे लग्न कसे होईल, याचेही प्लानिंग करुन ठेवले आहे.''
पुढे वाचा, रितेशने सांगितली, रिआनच्या नावामागची कहाणी...