अहमदाबाद - शहरातील नरोडा भागात राहणारा प्रसिद्ध आर्टिस्ट रितेश यादवने ‘बाहुबली-2’ च्या अनेक पात्रांना 3D पेंटमध्ये साकारले आहे. सोशल मीडियावर सध्या या पेंटिंग्सचे कौतुक होत असून ते व्हायरल होत आहेत. बाहुबलीच्या ऑफिशियल वेबसाईट्सवरही हे पेंटिंग्स आहेत.
घरालाच बनवले 3D हाऊस…
रितेश यादवचे नवीन 3डी प्रोजेक्ट सोशल मीडियावर धूम करत आहे. आतापर्यंत त्याचे 3 डी पेंटिंग्स 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. रितेशने त्याच्या घरालाही 3डी डिझाइन केले आहे. त्याच्या घराच्या प्रत्येक भिंतीवर 3 डी पेंट करण्यात आले आहे. त्याचे घर 3डी हाऊस दिसते. लोक त्याची कला पाहण्यासाठी घरी गर्दी करतात. लोक त्याच्या घरालाच 3 D हाऊस म्हणू लागले आहेत.
3डी पेंटिंग करण्याचा छंद
रितेश एका खासगी कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर आहे. त्याची पहिली पसंती पेंटिंग्सला आहे. रिकाम्या वेळेत तो नेहमी पेंटिंग्समध्ये काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. ‘बाहुबली-2’ मध्ये केलेल्या त्याच्या 3डी पेंटिंग्सने त्याला एका रात्रीत स्टार बनवले आहे. राम्या कृष्णनने त्यांच्या बाहुबली पेजवर रितेशच्या पेंटिंग शेअर केल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रितेशच्या पेंटिंग्सचे PHOTOS...