आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा या अॅक्ट्रेसने वेटरकडे केली चक्क प्रणयाची मागणी, वाचा मग पुढे काय झाले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉन्ट्रोव्हर्शियल मर्डर केसवर आधारित ‘डार्क चॉकलेट’मध्ये शीना वोराची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिया सेन काही दिवसांपूर्वी एका शॉर्ट फिल्ममध्ये लेस्बियनची भूमिका साकारताना दिसली होती. तिच्या या भूमिकेविषयी चर्चा रंगू लागली असतानाच तिने एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते, की ती एवढी सेक्सी आहे की  मुलीदेखील तिच्यासोबत सेक्स करू इच्छितात. अलीकडेच रियासोबत मुंबईत एक विचित्र घटना घडली. 

वेटरकडे रियाने अंड्याऐवजी केली सेक्सची मागणी...  
मित्रासोबत एका रेस्तराँमध्ये गेलेल्या रियाने चक्क वेटरकडेच सेक्सची डिमांड केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याचे झाले असे की, रिया मुंबईमधील अंधेरी स्थित एक ईटरीत (रेस्तराँ) मित्रासोबत डिनरसाठी गेली होती. या रेस्तराँचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी ‘फेमस नॉटी कॉकटेल सेक्स ऑन द बीच’ ही डिश आहे. जी ग्राहकांच्या आग्रहास्तव ऑफर केली जाते. मात्र रियाला कॉकटेल ड्रिंक प्यायचे नव्हते. तिला बॉइल अंड्यांपासून बनविलेल्या एका खास डिशची चव चाखायची होती. रेस्तराँमधील वेटरला ही बाब समजल्यानंतर त्याने लगेचच रियाला ‘एग्ज ऑन द बीच’ ही डिश ऑफर केली. यादरम्यान रिया खूपच दमलेली होती. ती तिच्या पार्टनरसोबत मेन्यूविषयी डिस्कस करीत होती. 

त्याचवेळी वेटरने रियाला ऑर्डरविषयी विचारले. मात्र रियाच्या तोंडून असे काही शब्द आलेत की, वेटर दंग राहिला. ती वेटरला चक्क Could I have some SEX please असे म्हणाली. रियाचे हे शब्द ऐकताच वेटर पुरता गोंधळून गेला. त्याला काय करावे हेच काही काळ सूचत नव्हते; मात्र रियाला ती काय बोलली याची तिला नंतर जाणीव झाली. कळत-नकळत तिच्या तोंडून बोलले गेलेले शब्द परत घेण्यासाठी तिचा आटापिटा सुरू झाला. रियाने लगेचच वेटरला Could I have some eggs please? असे म्हटले. रियाचे शब्द ऐकताच वेटर धीरगंभीर उभा राहिला; मात्र त्याच्याकडे बघून रियाला मात्र हसू आवरता आले नाही. 

पुढे वाचा, जेव्हा व्हायरल MMS मुळे झाली होती रियाची बदनामी...
 
बातम्या आणखी आहेत...