आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रागिनी एमएमएस 2 'च्या सिक्वेलमध्ये सनीऐवजी दिसणार रिया सेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकता कपूरच्या 'रागिनी एमएमएस 2'ने 2014 मध्ये चांगली कमाई केली होती. आता एकता या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत आहे. हा सिक्वेल चित्रपटगृहात नाही तर एकताच्या नव्या व्हेंचर ऑल्टबालाजी अॅपवर दाखवला जाणार आहे. गेल्या चित्रपटात रागिनीची भूमिका सनी लिओनीने साकारली होती. आता तिच्याऐवजी रिया सेनला संधी देण्यात येणार असल्याचे समजते. 

अशी असेल भूमिका...  
रियाया वेब सिरीजमध्ये एका लग्न झालेल्या महिलेची भूमिका साकारणार आहे. ती कशा प्रकारची असेल, याबाबत अद्याप कोणतीच माहिती हाती आलेली नाही. रियाने मात्र या भूमिकेची तयारी सुरू केली आहे. या महिन्यात या चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे. 

पुढे वाचा, वेब सीरिजमध्ये रोनित रॉय आणि मोना सिंहही... 
बातम्या आणखी आहेत...