आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी हा फेमस अॅक्टर होता अमिताभ यांचा बॉडीगार्ड, आता या फिल्ममध्ये करतोय सोबत काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः  रामगोपाल वर्मांच्या आगामी 'सरकार 3' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सरकार सीरिजचा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी 2005 मध्ये 'सरकार' आणि 2008 मध्ये 'सरकार राज' हे सिनेमे रिलीज झाले आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोनित रॉय हा प्रसिद्ध अभिनेता स्क्रिन शेअर करणार आहे. रोनित रॉय अभिनेत्यासोबतच स्वतःची सिक्युरिटी कंपनी चालवतो. त्याच्या कंपनीचे नाव Ace सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन एजन्सी असे आहे. अमिताभ, सलमान, शाहरुख, आमिर खान या स्टार्ससह अनेक सेलिब्रिटींना रोनितची एजन्सी सुरक्षा देत असते. सुरुवातीच्या काळात रोनित स्वतः बॉडीगार्ड बनून बिग बी आणि आमिर यांना प्रोटेक्ट करताना दिसायचा.  
 
रोनितने सी रॉक हॉटेलमध्ये केलंय बार टेंडिंगचे काम...
11 ऑक्टोबर 1965 रोजी नागपूरमध्ये जन्मलेल्या रोनित रॉयने शालेय शिक्षणानंतर हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो मुंबईत दाखल झाला आणि दिग्दर्शक सुभाष घईंच्या घरी राहू लागला. रोनितने मुंबईतील सी रॉक हॉटेलमध्ये काही दिवस मॅनेजमेंट ट्रेनी म्हणूनही काम केले होते. येथे त्याला क्लिनिंग, टेबल सर्विंग आणि बार-टेंडिंगचे काम करावे लागले होते. त्यानंतर त्याला 1992 साली  'जान तेरे नाम' या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. हा सिनेमा मात्र फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर त्याने बम ब्लास्ट, हलचल आणि जुर्माना या काही सिनेमांक काम केले खरे, पण त्याला रुपेरी पडद्यावर फारसे यश मिळू शकले नाही.
 
फिल्मी करिअर अपयशी ठरल्याने सुरु केली सिक्युरिटी एजन्सी...
सिनेमांमध्ये फारसे यश मिळत नसल्याचे बघून रोनितने 2003 साली Ace Security and Protection agency नावाने स्वतःची कंपनी सुरु केली आणि बॉलिवूड स्टार्ससोबतच प्रॉडक्शन हाऊसेसना सिक्युरिटी पुरवण्याचे काम सुरु केले. दरम्यानच्या काळात तो टीव्ही इंडस्ट्रीकडे वळला. 2002 साली त्याला एकता कपूरच्या बालाजी टेलीफिल्मकडून 'कमाल' या मालिकेची ऑफर आली. त्यानंतर तो 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत ऋषभ बजाजच्या भूमिकेत झळकला. रोनितची मालिका आणि त्याची भूमिका खूप गाजली होती.  

या टीव्ही मालिकांमध्ये केलंय रोनितने काम...  
रोनित रॉयने क्योंकि सास भी कभी बहू थी, श्श्श कोई है, विकराल और गबराल, कसम से, कयामत, बंदिनी, अदालत आणि 24 सीजन 2 या टीव्ही शोजमध्ये काम केलंय.  
 
या फिल्म्समध्ये झळकला आहे रोनित..
रोनितला लीड रोल कमीच मिळालेत. मात्र सपोर्टिंग रोलमध्ये तो सिनेमांमध्ये झळकत असतो. आर्मी, दानवीर, खतरों के खिलाडी, स्टूडेंट ऑफ द ईयर, बॉस, 2 स्टेट्स, अगली, गुड्डू रंगीला, डोंगरी का राजा, काबिल आणि सरकार 3 हे त्याचे प्रमुख सिनेमे आहेत.  
 
स्टार्स आणि बॉडीगार्ड्स यांच्यातील नाते... 
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांचे त्यांच्या बॉडीगार्ड्सोबत मैत्रीचे संबंध आहेत. चाहत्यांच्या गराड्यात स्टार्सना गाडीपासून ठिकाणापर्यंत आणि पुन्हा गाडीपर्यंत आणणे खूप अडचणीचे काम असते. बॉडीगार्ड्सकडून मिळणा-या सुरक्षाच्या बदल्यात स्टार्सही त्यांच्या भविष्याची सुरक्षा करतात.

स्टार्स आणि त्यांच्या बॉडीगार्ड्समधील नाते जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...