आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rumoured Couple Harbhajan Singh And Geeta Basra Is Likely To Marry Soon

या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत लवकरच लग्नगाठीत अडकणार हरभजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हरभजनसिंग आणि )

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्पिनर हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा त्यांच्या रिलेशनशिपबद्दल बोलण्याचं नेहमीच टाळतात. मात्र आता हे दोघे लवकरच लग्नगाठीत अडकणार असल्याची चर्चा आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गीता आणि हरभजन गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात हे दोघे विवाहबद्ध होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीदेखील हरभजन आणि गीता यांच्या साखरपुड्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. मात्र गीताने साखरपुड्याच्या बातम्या अफवा असल्याचे सांगत हरभजन केवळ एक चांगला मित्र असल्याचे म्हटले होते.
लग्नाच्या बातमीचाही गीताने इंकार केला आहे. "जेव्हा मी हा निर्णय घेईन तर तुम्हाला जरुर कळेल. खरंतर स्वत:च्या खासगी आयुष्याबद्दल बोलणं मला आवडत नाही. मला दररोज माझ्या आणि हरभजनच्या लग्नाशी संबंधित 20 गोष्टी वाचायला मिळतात. माझं लग्न होईल तेव्हाच मी याबाबत बोलेन," असे गीताने सांगितले. आता गीता कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असली तरीदेखील सूत्रांकडून त्यांच्या लग्नाची बातमी उघड झालीच आहे.
या दोघांची स्पेशल केमिस्ट्री अनेक इव्हेंट्समध्ये बघायला मिळाली. क्रिकेट सामन्यांदरम्यान गीता हरभजनला चिअरअप करताना दिसली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसलेल्या हरभजन आणि गीताची खास छायाचित्रे...