आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: शाहरुखसोबत दिसली सचिनची खास बाँडिंग, शिखरच्या मुलासोबत युवीची धमाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ या सिनेमाच्या प्रीमिअरला क्लिक झालेले सेलेब्सचे कँडिड मोमेंट्स... - Divya Marathi
‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ या सिनेमाच्या प्रीमिअरला क्लिक झालेले सेलेब्सचे कँडिड मोमेंट्स...
मुंबईत बुधवारी रात्री सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बेतलेल्या  ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ या सिनेमाचा भव्यदिव्य प्रीमिअर सोहळा पार पडला. या प्रीमिअरला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंह यांच्यापासून ते अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन, रवीना टंडन, रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी, जॉन अब्राहम या प्रीमिअरला पोहोचले. सचिनच्या फिल्मच्या स्क्रिनिंगला अवतरले तारांगण, सलमानला वगळता पोहोचले अनेक Celebs

एवढे सेलिब्रिटी एकत्र आल्यानंतर गप्पा आणि धमाल-मस्ती झाली नाही, तरंच नवल. यावेळी हे सेलिब्रिटी एकमेकांसोबत गप्पा मारण्यात दंग दिसले. सचिनसोबत शाहरुखची खास बाँडिंगसुद्धा बघायला मिळाली. काही चाहत्यांसोबत शाहरुखने सेल्फी घेतला. तर अलीकडेच एंगेज्ड झालेले सागरिका घाटगे आणि झहीर खानसुद्धा या प्रीमिअरला पोहोचले. आपल्या एका छोट्या चाहत्याला ऑटोग्राफर देताना झहीर दिसला. तर सचिननेसुद्धा त्याच्या फॅन्सना ऑटोग्राफ दिला. शिखर धवन पत्नी आणि मुलासोबत यावेळी उपस्थित होता. शिखर धवनच्या चिमुकल्या मुलासोबत युवराज सिंह धमाल करताना कॅमे-यात क्लिक झाला. यासह प्रीमिअर सोहळ्यातील पडद्यामागचे असेच खास क्षण आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहेत.  'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'च्या प्रीमिअरला भाव खाऊन गेली सचिनची लाडकी लेक

पुढील स्लाईड्सवर बघा, ‘सचिन : अ बिलियन ड्रिम्स’ या सिनेमाच्या प्रीमिअर सोहळ्यातील Inside Photos   
 
बातम्या आणखी आहेत...