आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : यांच्या हेअरस्टाइलची कॉपी करत होत्या देशभरातील मुली, करीना-करीश्माची होती मावशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे साधना शिवदासानी. आपल्या विशिष्ठ हेअरकटमुळे स्टाइल आयकॉन ठरलेल्या साधना आज हयात असत्या तर त्यांनी वयाची 76 वर्षे पूर्ण केली असती.  25 डिसेंबर 2015 रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकेकाळी चंदेरी दुनियेतील फॅशन आयकॉन राहिलेल्या एका देखण्या आणि गुणी अभिनेत्रीला सिनेसृष्टी मुकली.

साधना यांनी 60 ते 70 च्या दशकात जवळपास 35 हिट सिनेमांमध्ये काम केले होते. यात ‘वो कौन थी’, ‘मेरा साया’, ‘गीता मेरा नाम’, ‘दिल दौलत दुनिया’, ‘दुल्हा दुल्हन’, ‘हम दोनो’ या सिनेमांचा समावेश आहे. ‘गीता मेरा नाम’ या सिनेमाचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते. ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार में’, ‘आजा आई बहार दिल है बेकरार’, ‘लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो’ यांसारखी हिट गाणी त्यांच्यावर चित्रीत करण्यात आली होती.

2 सप्टेंबर 1941 रोजी कराची, पाकिस्तान (त्याकाळी सिंध, ब्रिटिश इंडिया)मध्ये साधना यांचा जन्म झाला होता. प्रसिद्ध नृत्यांगणा साधना बोस यांच्या नावावर त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते.

आपल्या अभिनय, सौंदर्य आणि हेअरस्टाइलमुळे प्रसिद्ध झालेल्या साधना आता आपल्यात नाहीत, मात्र कलाकृतींच्या माध्यमातून त्या नेहमीच आपल्यात असतील. साधना यांची आठवणीतील छायाचित्रे आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर..
 
 
 
बातम्या आणखी आहेत...