आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Anniversary Spl: करीनाच्या लग्नात हजर होती तिची सावत्र मुलगी सारा, पाहा Wedding Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सैफ-करीना, करीनासोबत सारा आणि खाली - दिवंगत सुनंदा पुष्करसोबत करीना-करिश्मा - Divya Marathi
सैफ-करीना, करीनासोबत सारा आणि खाली - दिवंगत सुनंदा पुष्करसोबत करीना-करिश्मा
बॉलिवूड स्टार्स करीना कपूर आणि सैफ अली खान आज म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करत आहेत. 16 ऑक्टोबर 2012 रोजी हे दोघे लग्नगाठीत अडकले होते. करीना सैफची दुसरी पत्नी असून त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंहसोबत झाले होते.

करीना सैफपेक्षा वयाने 10 वर्षे लगान आहे. 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या करीनाचे अभिनेता शाहिद कपूरसोबत बरीच वर्षे अफेअर होते. मात्र शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सैफची एन्ट्री तिच्या आयुष्यात झाली.
सैफ-करीनाची लव्ह स्टोरी
सैफ-करीनाला त्यांचे चाहते सैफीना या नावानेसुद्धा ओळखतात. टशनच्या सेटवर या दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली होती. शूटिंगच्या काळात दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यांनी आपले नाते कधीही जगापासून लपवून ठेवले नव्हते.
लग्नात पोहोचले होते अनेक दिग्गज
छोट नवाब सैफ अली खआन आणि करीना कपूरच्या लग्नाचे तब्बल आठवडाभरा सेलिब्रेशन सुरु होते. मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर, काँग्रेस नेता राहुल गांधी, फारुख अब्दुल्ला, ज्योतिरादित्य सिंधिया, गीतकार प्रसून्न जोशी, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास, क्रिकेटर कपिल देवसह अनेक मान्यवर त्यांच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते.
सैफची मुलगी सारा लग्नात होती हजर
लग्नात सैफची मुलगी सारा अली खान सहभागी झाली होती. सारा आपल्या मैत्रिणींसोबत लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये आली होती. आपल्या वडिलांचे दुसरे लग्न एन्जॉय करताना ती दिसली होती. सावत्र आई करीनासोबत साराचे खूप चांगले बाँडिंग आहे. करीना आणि सैफच्या
लग्नाच्या वेळी सारा 16 वर्षांची होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सैफ-करीनाच्या लग्न आणि रिसेप्शनची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...