आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: कमी वयातच वडील झाला होता सैफ, वयाने मोठी होती पहिली पत्नी अमृता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सैफ अली खान आज त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. कमी वयातच वयाने मोठ्या असलेल्या अमृता सिंगबरोबर सैफ अली खान लग्नगाठीत अडकला होता. केवळ 23 वर्षाचा असताना तो पहिल्यांदा वडील झाला होता. सारा ही सैफ अली खानची थोरली मुलगी आहे. वयाच्या 23 व्या वर्षी सैफ पहिल्यांदा बाबा झाला होता. 1993 मध्ये जन्मलेली सारा सैफ आणि त्याची पहिली पत्नी अमृता यांची मुलगी आहे.
 
आता तीन मुलांचा बाबा आहे सैफ...
साराच्या जन्मानंतर म्हणजे आठ वर्षांनी म्हणजे 2001 साली सैफ आणि अमृता यांचा मुलगा इब्राहिमचा जन्म झाला. सैफ आणि अमृता यांचे 1991 साली लग्न तर 2004 साली घटस्फोट झाला होता. त्यानंतर 2012 मध्ये सैफने अभिनेत्री करीना कपूरसोबत दुसरे लग्न केले. या दोघांचा एक मुलगा असून त्याचे नाव तैमूर आहे.
 
आता काय करतात सैफची मुले...
सैफची मुलगी सारा हिचे 2016 साली ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. आता ती बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत आहे. सारा अद्याप मोठ्या पडद्यावर झळकली नाही, पण ती ग्लॅमर वर्ल्डसोबत जुळली आहे. 2012 साली 'हॅलो' या फॅशन मॅगझिनसाठी तिने आई अमृतासोबत एक खास फोटोशूट केले होते. त्यानंतर ऑगस्ट 2012 मध्ये तिने मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी होस्ट केलेल्या पार्टीत रॅम्पवॉक केला होता. ही पार्टी डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी इंडस्ट्रीत 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने होस्ट करण्यात आली होती.
 
सध्या शिकतोय इब्राहिम...
सैफचा मुलगा इब्राहिम हा आता 16 वर्षांचा असून शिक्षण घेतोय. इब्राहिमने यशराज प्रॉडक्शनच्या 'टशन' या सिनेमात सैफच्या बालपणीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा विजय कृष्ण आचार्य यांनी दिग्दर्शित केला होता. तर सैफचा सगळ्यात लहान मुलगा तैमूर आता फक्त सात महिन्यांचा आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात करीनाने तैमूरला जन्म दिला.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, सैफची मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिमचे निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...