आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना नव्हे जेव्हा अमृताचा पती होता सैफ अली खान, PHOTOSमधून पाहा दोघांची केमिस्ट्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आज आपला 45वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याचा जन्म 16 ऑगस्ट, 1970ला झाला.
Poll Widget Placeholder
सैफ अली खान बॉलिवूडच्या असा अभिनेत्यांमध्ये सामील होतो, ज्यांच्या लव्हस्टोरीचा दु:खद अंत झाला आहे.
ऑक्टोबर 1991मध्ये सैफ आणि अमृता यांच्या लग्ना सैफ केवळ 21 वर्षांचा होता. तेव्हा सैफचे करिअर सुरुसुध्दा झाले नव्हते. बातम्यांनुसार, सैफचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. लग्नानंतर सैफ अनेक वर्षे अमृतासोबत तिच्या घरीच राहिला. दोघांना सारा आणि अब्राहम ही दोन मुले आहेत. 13 वर्षे या दोघांचा संसार टिकला. मात्र 2004 साली सैफ आणि अमृता घटस्फोट घेऊन विभक्त झाले.
असे म्हटले जाते, की सैफचे इटालियन गर्ल रोजा कॅटलानोबरोबर अफेअर सुरु झाल्यानंतर अमृताने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र हे दोघे विभक्त झाले असले तरीदेखील आजही अमृताला आपण विसरु शकलो नसल्याचे सैफने एका मुलाखतीत म्हटले होते.
आपल्या एका मुलाखतीत सैफने म्हटले होते की, तो आपली पहिली पत्नी अमृता आणि दोन मुलांना कदाचितच विसरु शकले.
तर 2005 साली अमृता सिंगने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, घटस्फोटाचे कारण फक्त मला आणि सैफलाच ठाऊक आहे आणि शेवटपर्यंत यामागचे सत्य फक्त आमच्यातच राहिलं.
सैफ आता त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेला आहे. 2012मध्ये त्याने आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केले. करीना आणि सैफच्या पहिल्या पत्नीच्या मुलांमध्ये फ्रेंडली रिलेशन आहेत.
सैफ अली खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया सैफ-अमृताच्या 13 वर्षांच्या संसारातील काही निवडक छायाचित्रांवर..