आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली पत्नी 12 वर्षांनी मोठी तर दुसरी 10 वर्षांनी लहान, असे आहे सैफचे आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पहिला पत्नी अमृता सिंग, सैफ अली खान आणि करीना कपूर)
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आज 45 वर्षांचा झाला आहे. सैफ अली खानचा जन्म 16 ऑगस्ट 1970मध्ये पटौदीच्या नवाबांच्या घरी झाला. त्याचे वडील मंसूर अली खान पटौदी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि पटौदीचे नवाब होते. सैफने 42व्या वर्षी स्वत:पेक्षा 10 वर्षांनी लहान करीना कपूरसह 2012मध्ये संसार थाटला. यापूर्वी सैफने स्वत:पेक्षा 12 वर्षांनी मोठी अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्न केले होते. 2004मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांना सारा आणि अब्राहम ही दोन मुले आहेत.
सैफ अली खानची आई शर्मिला टागोर हिंदी सिनेमाचा एक चर्चित चेहरा आहे. सैफ अली खानने 1992मध्ये आलेल्या 'परंपरा' सिनेमामधून अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर 'आशिक आवारा'साठी त्याला फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. 'मै खिलाडी तू अनाडी', 'ये दिल्लगी', 'कच्चे धागे', 'तू चोर मै सिपाही'सारख्या सुपरहिट मल्टिस्टारर सिनेमांमध्ये त्याने अभिनय केला. सुरुवातीला सैफला एक अभिनेता म्हणून सोलो अभिनय करण्यास नकारल्यानंतर तो केवळ मल्टिस्टारर सिनेमांमध्येत दिसू लागला.
'दिल चाहता है'पासून करिअरला मिळाली कलाटणी
फरहान अख्तरचा 'दिल चाहता है' सैफच्या करिअरच्या कलाटणी देणारा सिनेमा ठरला. या सिनेमात सैफशिवाय आमिर खान आणि अक्षय खन्ना यांच्यासुध्दा मुख्य भूमिका होत्या. तीन मित्रांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा लोकांनी डोक्यावर घेतला होता.
'हम तुम'ने एक सोलो अभिनेता म्हणून स्थापित झाला सैफ
पहिल्यांदा सैफ अली खानने सोलो अभिनेता म्हणून 'हम तुम'मध्ये काम केले. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या सिनेमासाठी सैफला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारसुध्दा मिळाला.
'लंगडा त्यागी' बनून कमावले नाव
2007मध्ये आलेल्या विशाल भारव्दाजच्या 'ओमकारा'साठी सैफ अली खानला सर्वश्रेष्ठ खलनायक म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. सैफने 'लंगडा त्यागी' नावाच्या एका गुंड्याची भूमिका साकारली होती. सैफचे हे ग्रे शेड पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. हा सिनेमा शेक्सपिअरचे प्रसिध्द नाटक 'ओथेला'वर आधारित होता. दिग्दर्शक इम्तियाज अलीचा 'लव्ह आजकल'मधून सैफने एक निर्मिता म्हणून नवीन सुरुवात केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सैफ अली खानच्या बालपणीपासून ते आतापर्यंतची छायाचित्रे...सोबतच पाहा करीना कपूरसह छोटा नवाबचे Pics...