आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बॉयफ्रेंड\' आणि भावासोबत पार्टी करताना दिसली सैफची लेक, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वीर पहरिया (डावीकडे), एक फ्रेंड आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत सारा अली खान - Divya Marathi
वीर पहरिया (डावीकडे), एक फ्रेंड आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत सारा अली खान
मुंबई: सैफ अली खान आणि त्याची पूर्वीश्रमीची पत्नी अमृता सिंहची मुलगी सारा अली खानचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात सारा कथित बॉयफ्रेंड वीर पहरिया आणि भाऊ इब्राहिम अली खानसोबत पार्टी करताना दिसत आहे. 23 वर्षांच्या साराने नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. आता ती बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची सज्ज झाली आहे.
'स्टुडेंट ऑफ दी ईअर' असेल साराचा पहिला सिनेमा...
रिपोर्ट्सनुसार, सारा करण जोहरच्या 'स्टुडेंट ऑफ दी ईअर 2' या आगामी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसुद्धा पदार्पण करणार आहे. मात्र, अद्याप याची ऑफिशिअर घोषणा झालेली नाहीये.
जेव्हा आली साराच्या साखरपुड्याची बातमी...
यावर्षी जूनमध्ये सारा सारा 'सैराट' या मराठी सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचली होती. तेव्हा तिने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिच्या हातात अंगठी दिसली. त्यावेळी तिचे काही फोटो क्लिक करण्यात आले होते. त्या फोटोंमुळे साराने बॉयफ्रेंड वीर पहरियासोबत साखरपुडा केल्याची बातमी समोर आली होती. दोघांच्या अफेअरच्या बातम्या याचवर्षी मे महिन्यात लीक झाल्या होत्या. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सारा 23 वर्षांची आहे.
कोण आहे वीर पहरिया...
वीर दुबईमध्ये शिकत असून पॉप स्टार होण्याचे त्याचे स्वप्न आहे. मे महिन्यात एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात सारा वीरला किस करताना दिसत होती. एका FM चॅनलसोबत बातचीत करताना साराने वीरविषयी सांगितले होते, 'त्याला रस्त्यावरील डोसा खायला आवडतो, तो खूप भावूक आहे, त्याच्यासोबत बीचवर जायला आवडते. तो असाच व्यक्ती आहे.' वीर राजकिय आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वीक आणि इतर फ्रेंड्ससोबत साराचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...