Home | Gossip | Saif Ali Khan Film Cocktail Completed 5 Year Of Release

नातेसंबंधः करीना कपूरच्या आतेभावाची मुलगी आहे नव्या, नात्याने सैफची वहिनी होते श्वेता बच्चन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 13, 2017, 12:11 PM IST

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सैफच्या सासरच्या नातेवाईकांविषयी सांगत आहोत...

 • Saif Ali Khan Film Cocktail Completed 5 Year Of Release
  एन्टरटेन्मेंट डेस्कः सैफ अली खान स्टारर 'कॉकटेल' या सिनेमाच्या रिलीजला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. 2012 साली रिलीज झालेल्या या सिनेमात दीपिका पदुकोण लीड रोलमध्ये होती. तर डायना पेंटीचा हा पदार्पणातील पहिला चित्रपट होता. होमी अदजानिया या सिनेमाचे दिग्दर्शक तर सैफ अली खान निर्माता होता. सैफ अली खानचे बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक नातेवाईक आहेत. त्यांच्यासोबतचे सैफचे नाते फारसे कुणाला ठाऊक नाही. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सैफच्या सासरच्या नातेवाईकांविषयी सांगत आहोत...

  नव्या नवेलीची आत्या आहे सैफ अली खानची पत्नी करीना...
  सैफ अली खानचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंहसोबत 1991 साली झाले होते. 2004 साली त्यांचा घटस्फोट झाला. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही त्यांच्या मुलांची नावे आङेत. सैफचे दुसरे लग्न करीना कपूरसोबत झाले होते. 2012 साली दोघांचे लग्न झाले. तैमूर हे सैफ-करीनाच्या मुलाचे नाव आहे. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीची करीना नात्याने आत्या होते. म्हणजेच सैफ अली खान नव्याचा नात्याने मामा (आत्याचे पती) होतो. नव्या ही बिग बींची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची मुलगी आहे. करीना कपूरची आत्या रितू नंदा यांचा मुलगा निखिल नंदासोबत श्वेताचे लग्न झाले आहे. म्हणजेच निखिल नंदा करीना कपूरचा आतेभाऊ आहे.
  पुढील स्लाईड्सवर वाचा, बॉलिवूडमध्ये आणखी कोणकोणते सेलिब्रिटी आहेत, सैफचे नातेवाईक...

 • Saif Ali Khan Film Cocktail Completed 5 Year Of Release
  श्वेता बच्चन नंदा आहे वहिनी...

  सैफ अली खान, कपूर घराण्याचा जावई आहे. या नात्याने बिग बींची मुलगी श्वेता बच्चन नंदा ही सैफची वहिनी होते. करीनाची आत्या रितू नंदा यांची श्वेता सून आहे. श्वेताचे लग्न रितू नंदा यांचा मुलगा निखिल नंदासोबत झाले आहे. निखिल, करीना आणि करिश्मा यांचा आते भाऊ आहे. रितू नंदा या राज कपूर यांच्या कन्या आणि रणधीर-ऋषी कपूर यांची बहीण आहे. श्वेता आणि निखिल नंदा यांना नव्या नवेली नंदा ही मुलगी आणि अगस्त्य नंदा हा मुलगा आहे.  
   
 • Saif Ali Khan Film Cocktail Completed 5 Year Of Release

  ऋषी कपूर चुलत सासरे, तर नीतू सिंह चुलत सासूबाई...

   
  ऋषी कपूर आणि नीतू कपूर हे करीनाचे सख्ख्ये काका-काकू आहेत. या नात्याने ऋषी कपूर हे सैफचे चुलत सासरे तर नीतू कपूर या चुलत सासूबाई आहेत. तर ऋषी-नीतू यांचा मुलगा रणबीर कपूर सैफचा मेहुणा होतो. ऋषी कपूर हे करीनाचे वडील रणधीर कपूर यांचे धाकटे भाऊ आहेत. 
   

 • Saif Ali Khan Film Cocktail Completed 5 Year Of Release

  रितू नंदा आणि रीमा जैन आहेत आतेसासू...


  रणधीर कपूर यांना दोन बहिणी आहेत. रितू नंदा आणि रीमा जैन ही त्यांची नावे आहेत. या दोघी नात्याने करीनाच्या आत्या आहेत. तर सैफच्या या दोघी आते सासूबाई आहेत.

   
 • Saif Ali Khan Film Cocktail Completed 5 Year Of Release

  रणबीर, आदर आणि अरमान आहेत मेहुणे...

   
  रणबीर कपूर, करीनाचे काका ऋषी कपूर यांचा मुलगा आहे. या नात्याने तो सैफचा मेहुणा होतो. तर रीमा जैन यांची मुले आदर आणि अरमान हे करीनाचे आते भाऊ आहेत. या नात्याने हे दोघेही सैफचे मेहुणे होतात.  

   
 • Saif Ali Khan Film Cocktail Completed 5 Year Of Release
  करिश्मा, रिद्धिमा आहे मेहुणी...
   
  करीनाची सख्खी बहीण करिश्मा कपूर नात्याने सैफची मेहुणी आहेत. तर ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धीमा ही करीनाची चुलत बहीण आणि सैफची मेहुणी आहे.
 • Saif Ali Khan Film Cocktail Completed 5 Year Of Release

  सासूसासरे आहेत बबिता आणि रणधीर कपूर...


  बबिता आणि रणधीर कपूर यांची मुलगी करीना कपूर सैफची पत्नी आहे. या नात्याने सैफ त्यांचा जावई आहे.  

 • Saif Ali Khan Film Cocktail Completed 5 Year Of Release
  साधना होत्या मावस सासू...

  अभिनेत्री साधना (आता या जगात नाहीत) करीनाच्या आई बबिताची चुलत बहीण होती. या नात्याने साधना करिश्मा आणि करीनाच्या मावशी आणि सैफच्या मावस सासूबाई होत्या.  
 • Saif Ali Khan Film Cocktail Completed 5 Year Of Release

  जावई (बहिणीचा नवरा) आहे कुणाल खेमू...


  अभिनेता कुणाल खेमूचे लग्न सैफ अली खानची धाकटी बहीण सोहा अली खानसोबत झाले आहे. या नात्याने कुणाल सैफचा जावई होतो.  

Trending