आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूच्या भितीपोटी शर्मिला टागोर यांना हटवावे लागले होते बिकिनी फोटोचे होर्डींग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सैफ अली खान सध्या त्याच्या अपकमिंग 'कालकांडी' चित्रपटांचे शूटिंग करत आहे. काही दिवसांपूर्वीच सैफचा या चित्रपटातील लूक समोर आला असून तो त्यात वियर्ड दिसत आहे. त्यामुळे त्याची चर्चा होत आहे. पण लूकमुळे चर्चा करण्याबाबत विषय निघाला तर सैफची आई शर्मिला टागोरही याबाबतीत मागे नाही. त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळातच बिकिनी परिधान करून सर्वांनाच हादरा दिला होता. शर्मिला यांनी 1967 मध्ये आलेल्या 'अॅन इव्हीनिंग इन पॅरिस' चित्रपटात बिकिनी आणि स्विमसूट परिधान केला होता. त्याचे पोस्टर त्याकाळात ठिकठिकाणी लावले होते. 

यामुळे शर्मिला यांना आले होते पोस्टरचे टेन्शन 
- शर्मिला आणि मन्सूर अली खान पतौडी यांचे अफेयर हा चर्चेचा विषय होता.
- मुंबईत ठिकठिकाणी 'अॅन इव्हनिंग इन पॅरिस'चे मोठे-मोठे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यात तिने बिकिनी परिधान केली होती.  
- त्यात एक दिवस शर्मिला यांना समजले की, मन्सूर अली पतौडी यांनी आई एक दिवस त्यांना भेटायला मुंबईत येत आहे. 
- त्यामुळे शर्मिला यांना टेन्शन आले होते. 
- पतौडी यांच्या आईला भेटण्यापेक्षा त्यांनी बिकिनीवरील फोटो होर्डींगवर पाहिले तर काय? त्या आपल्याला नकार तर देणार नाहीत या विचाराने त्या टेन्शनमध्ये आल्या होत्या. 

स्वतः हटवावे लागले पोस्टर
- शर्मिला यांना काहीही कळत नव्हते, दुसरीकडे मन्सूर यांना मात्र काहीही अडचण नव्हती. त्यांच्या मते ती शर्मिलाच्या व्यवसायाची गरज होती. 
- शर्मिला यांना जेव्हा काही समजले नाही, तेव्हा अखेर त्यांनी निर्मात्यांना फोन केला आणि बिकिनीचे पोस्टर हटवले. 
- शर्मिला त्यांच्या प्रयत्नात यशस्वी झाल्या, आणि नंतर त्यांचे पतौडी यांच्याशी लग्न झाले. पतौडी यांच्या आईंनाही त्या आवडल्या होत्या. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा शर्मिला यांचे बिकिनीवरील इतर पोटो आणि जाणून घ्या त्यांच्याशी संबंधित खास बाबी..

 
बातम्या आणखी आहेत...