आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिनाअगोदर सैफ या मॉडेलला करत होता डेट, बनली होती घटस्फोटाचे कारण..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिना कपूर, दुसऱ्या फोटोत रोजा कॅटलानोसोबत सैफ अली खान - Divya Marathi
करिना कपूर, दुसऱ्या फोटोत रोजा कॅटलानोसोबत सैफ अली खान
मुंबई - करिना कपूर सध्या करण जोहरच्या पार्टीमध्ये घालतेल्या बॅकलेस ड्रेसमुळे चर्चेत आहे. बाळंतपणानंतरही करिनाच्या सौंदर्यावर तसूभरही परिणाम झाला नाही, हेच या फोटोंमध्ये दिसून आले.
 
करिनाने सैफसोबत 2012 मध्ये लग्न केले होते. याअगोदर ते पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण फार कमी जणांना माहिती आहे की करिनाअगोदर सैफ एका मॉडेललाही डेट करत होता. 
करिनाअगोदर सैफ अली खान इटलीची मॉडेल रोजा कॅटलानोला डेट करत होता. याच प्रेमप्रकरणामुळे सैफ अली खानने पहिली पत्नी अमृता सिंगपासून घटस्फोट 
घेतला होता.  
 
जाणून घ्या कोण आहे रोजा..
 
- रोजा कॅटलाने एक स्वीस मॉडेल आहे. तिचा जन्म इटलीला झाला. तिने दोन वर्षे सैफला डेट केले. 
- असे म्हटले जाते की रोजा आणि सैफ लिव इन मध्ये राहत होते पण 2007 साली या दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली
- एका मुलाखतीत रोजाने सांगितले की सैफने तिला तो विवाहित आहे हे कधीच सांगितले नाही.
जेव्हा ती भारतात आली तेव्हा तिला कळाले की सैफ घटस्फोटीत आहे आणि त्याला दोन मुलेही आहेत.
 
केनियामध्ये झाली होती दोघांची पहिली भेट..
 
- रोजाने एका मुलाखतीत सांगितले की तिची आणि सैफची पहिली भेट केनियात झाली. रोजा तेथे 6 वर्षाच्या सोशल प्रोजेक्टसाठी गेली होती. सैफला भेटल्यानंतर तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला. रोजाने 'शौर्य' चित्रपटात एक आयटम नंबरही केला आहे.
 
2007 मध्ये सुरु झाले करिना-सैफचे अफेअर..
 
- 'जब वी मेट' चित्रपटाच्या शूटींगदरम्यान शाहिद-करिनाच्या ब्रेकअपची बातमी आली आणि लगेगचच सैफ अली खानने करिना कपूर आणि तो रिलेशनशीपमध्ये असल्याचे विधान केले.
 
- 'ओमकारा' चित्रपटादरम्यान या दोघांच्या जवळीकीची बातमी सर्वप्रथम आली होती. दोघांचे फार कमी सीन एकमेकांसोबत होते आणि सीन नसले तरी ते दोघे एकमेकांच्या सेटवर असत. 
 
- 'टशन' चित्रपटाच्या दरम्यान हे दोघे अजूनच जवळ आले. शूटींगनंतर वेळ भेटल्यानंतर दोघे लाँगवॉकसाठी जात. या दोघांचे अफेअर सुर असल्याच्या चर्चा होत होत्या पण त्या दोघांनी कधीच ते मान्य केले नाही. 
 
- लॅक्मे फॅशन वीकदरम्यान हे दोघे सोबत गाडीमध्ये आले आणि तेव्हा सैफने कबूल केले की तो करिनाला डेट करत आहे. 2010 मध्ये त्यांचे लग्न होणार अशी चर्चा होती पण त्या दोघांनीही ते नाकारले आणि 2012 साली विवाहबंधनात अडकले.
 
13 वर्षे सोबत होते सैफ-अमृता 
 
- ऑक्टोबर 1991 मध्ये सैफने अमृतासोबत विवाहाचा निर्णय घेतला त्यावेळी तो केवळ 21 वर्षाचा होता. त्याचे करिअरही त्यावेळी सुरु झाले नव्हते. चर्चा अशी होती की सैफचे कुटूंब या लग्नाच्या विरोधात होते त्यामुळे लग्नानंतर अनेक वर्षे सैफ तिच्याच घरी राहिला. दोघांना दोन मुले आहेत. सारा आणि इब्राहीम.
 
- 2004 मध्ये घटस्फोटानंतर मुले अमृतासोबतच राहतात.
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा रोजा आणि सैफचे काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...