आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफ अली खान बदलणार तैमूरचे नाव? जाणून घ्या का केलाय हा विचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सैफ अली खान त्याचा मुलगा 'तैमूर'चे नाव बदलण्याचा विचार करत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. तैमूर या नावामुळे त्याला शाळेत कोणत्याही प्रकारे समस्या निर्माण न होवो यासाठी सैफ त्याचे नाव बदलणार असल्याची चर्चा आहे.
 
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, सैफने मुलगा तैमूरच्या नावासंदर्भात बोलताना सांगितले की, केवळ नावामुळे तैमूरचा लोकांनी द्वेष करावा किंवा त्याची बदनामी व्हावी, अशी माझी इच्छा नाही. आजही लोक तैमूरच्या नावाबाबत प्रश्न विचारतात, असेही सैफने सांगितले. तैमूर नावाबाबत दिलेले स्पष्टीकरण काहींना पटलेदेखील आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या प्रमाणपत्राची मला गरज वाटत नाही, असेही सैफने स्पष्ट केले आहे.
 
करीना मात्र नाव न बदलण्याच्या विचारात...  
करीनाचे तैमूरचे नाव न बदलण्याचेच मत आहे. लोक आपल्यासोबत आहेत, आपल्या विचारांमुळे लोक आपला आदर करतात, त्यामुळे आता माघार घेणे योग्य नाही, असेही ती म्हणाली. मात्र, नावामुळे भविष्यात आमच्या मुलाला नावाचा त्रास तर होणार नाही ना, हा प्रश्न आहे. त्यामुळे दबावापोटी मी सहका-यांच्या मदतीने कमी अक्षरांचा नाव शोधून काढली. पण ती विचित्र वाटत असल्याने मी ही कल्पना रद्द केली. दरम्यान, नावामुळे शाळेत तैमूरला अडचणींचा सामना करावा लागला तर मी त्याचे नाव बदलू शकतो. नाव बदलण्यासाठी मला उशीर होईल की नाही हे माहिती नाही. तरीही तैमूर हे नाव नेहमी त्याच्यासोबत जोडलेले असणार, असेही सैफने यावेळी सांगितले. 
 
 
कोण होता तैमूर?
करीनाने 20 डिसेंबर 2016 रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. सैफीनाने त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले. त्यावरुन सोशल मीडियावर चांगलेच वादंग उठले होते. तैमूर लंग हा इस्लामिक राजा होता. आपले साम्राज्य जगभर करण्यासाठी त्याने जगावर हल्ले केले होते. त्याला क्रूरकर्माही म्हणायचे. भारतावरही त्याने हल्ला करुन असंख्य लोकांना ठार मारले होते. तैमूरचा मृत्यू 1 एप्रिल 1405 रोजी झाला. त्याला उज्बेकिस्तानमध्ये दफन केले गेले.
 
पुढे बघा, सैफ-करीनाचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...