मुंबई: मुंबईमध्ये सोमवारी (13 जून) 'सैराट' या मराठी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले. यावेळी सैफ अली खानची मुलगा सारा अली खानसुध्दा पोहोचली होती. मात्र सारा मीडियाला पाहून चेहरा लपवताना दिसली. तिने चेहरा का लपवला हे अद्याप कळालेले नाही. सारा नुकतीच ग्रॅजुएशन पूर्ण करून भारतात आली आहे. सारा पहिल्यांदा एखाद्या सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचली होती. सारा अभिनेत्री अमृता सिंह आणि अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे.
गेल्या काही दिवसांपासून सारा प्रसिद्ध राजकाराणी आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरियाला डेट करत असल्याची सर्वत्र आहे. असे आम्ही नाही, तर काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हे म्हटले गेले. कदाचित याच कारणामुळे साराने मीडियाला पाहून चेहरा लपवला का? याचे उत्तर सारालाच ठाऊक आहे.
मीडियात समोर आला फोटो...
- वीर आणि साराचा मीडियात एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये वीर साराला किस करताना दिसत होता.
- एका FM वाहिनीशी बोलताना सारा वीरविषयी म्हणाली होती, "तो स्त्याच्या कडेला मिळणारा डोसा सहज खाऊ शकतो. तो खूप सेंसिटिव्ह असून अशी एक व्यक्ती आहे, जिच्यासोबत तुम्ही बीचवर जाणे पसंत कराल."
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा साराचे या स्क्रिनिंगवेळचे Photos...