आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saif Ali Khan’S Daughter & Shahid Kapoor’S Brother To Romance In Debut Movie?

Buzz: डेब्यू फिल्ममध्ये शाहिदच्या भावासोबत रोमान्स करणार सैफची लाडकी लेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिग्दर्शक डेविड धवनचा मुलगा वरुण आणि महेश भट यांची लेक आलिया भट यांना 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे करण जोहरने लाँच केले होते. या सिनेमाच्या निमित्ताने वरुण आणि आलियाचे इंडस्ट्रीत यशस्वी पदार्पण झाले. आता या स्टार किड्सनंतर करण जोहर आणखी दोन स्टार किड्सना लाँच करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानची लेक सारा आणि शाहिद कपूरचा धाकटा भाऊ ईशान खट्टर या दोघांना करण जोहर लाँच करणार आहे. करण जोहर लवकरच एक अनयुज्युअल लव्ह स्टोरी प्रोड्युस करणार असून यामध्ये ईशान आणि साराला साइन करण्यात आले आहे. सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरु झाले आहे आणि लवकरच हे स्टार किड्स शुटिंगलाही सुरुवात करणार आहेत.
सैफच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे सारा
22 वर्षीय सारा, सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुलगी आहे. 1991 मध्ये सैफ आणि अमृता विवाहबद्ध झाले होते. या दोघांना एक मुलगासुद्धा असून इब्राहिम हे त्याचे नाव आहे. 2004 मध्ये सैफ आणि अमृता कायदेशीररित्या विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर 2012 मध्ये सैफने करीना कपूरसोबत दुसरा संसार थाटला.
शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे ईशान
ईशान खट्टर हा बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा सावत्र भाऊ आहे. शाहिदचे वडील आणि अभिनेता पंकज कपूर यांना घटस्फोट दिल्यानंतर त्याची आई नीलिमा अजीम यांनी 1990 मध्ये राजेश खट्टरसोबत दुसरे लग्न केले होते. 19 वर्षीय ईशान, नीलिमा आणि राजेश यांचा मुलगा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, फॅमिलीसोबतची सारा अली खान आणि ईशान खट्टरची छायाचित्रे...