आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाच्या Ex-बॉयफ्रेंडसोबत या अंदाजात दिसला सैफ, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नईदिल्लीः अभिनेता शाहिद कपूर आणि सैफ अली खान सध्या त्यांच्या आगामी 'रंगून'  या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचनिमित्ताने हे दोघेही सिनेमातील हीरोईन कंगना रनोटसोबत दिल्लीत पोहोचले होते. यावेळी शाहिद फंकी लूकमध्ये दिसला तर सैफने डेनिम आणि टीशर्टसोबत जॅकेट परिधान केले होते. अभिनेत्री कंगना रनोट रेड ड्रेसमध्ये दिसली. 

शाहिदच्या गळ्यात हात टाकून गप्पा मारताना दिसला सैफ...  
प्रमोशनदरम्यान सैफ अली खान त्याची पत्नी करीनाचा पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड शाहिदसोबत गप्पांमध्ये रमलेला दिसला. यावेळी सैफ शाहिदच्या गळ्यात हात टाकून गप्पा मारण्यात बिझी होता. हे दोघेही एका मॉलच्या पाय-यांवर बसून बराच वेळ फोटो काढत होते. या दोघांचा आगामी सिनेमा 'रंगून' हा दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.  

सैफ आणि शाहिदसोबत कंगनाने बोल्ड सीन्स...  
सिनेमात कंगनाने सैफ आणि शाहिदसोबत रोमान्स केला आहे. याची झलक सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळते.सिनेमात कंगनाने दोन्ही अभिनेत्यांसोबत बिनधास्तपणे इंटीमेट सीन्स दिले आहेत.खरं तर यापूर्वी कुठल्याही सिनेमा कंगना एवढी बोल्ड झाली नव्हती. 

ही आहे कंगनाची व्यक्तिरेखा...  
या सिनेमात कंगनाने ज्युलियाची भूमिका वठवली आहे. यामध्ये ती रिवॉल्व्हर आणि हंटर चालवताना दिसते. सिनेमाच्या सुरुवातीला कंगना सैफच्या प्रेमात दिसते.पण नंतर शाहिदसोबतची तिची जवळीक वाढते.कंगनाने दोन्ही अभिनेत्यांच्या प्रेयसीची भूमिका वठवली आहे.विशाल भारद्वाज दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 24 फेब्रुवारी रोजी रिलीज होतोय. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, 'रंगून'च्या प्रमोशनवेळी क्लिक झालेला शाहिद-सैफ आणि कंगनाचे Photos...
बातम्या आणखी आहेत...