आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडरवर्ल्डच्या भीतीने या अभिनेत्रीने सोडले बॉलिवूड, आता करतेय हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अंडरवर्ल्ड आणि बॉलिवूडचे फार जुने कनेक्शन आहे. अंडरवर्ल्डमुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचे करिअर खराब झाले आहे. त्यातीलच एक नाव आहे साक्षी शिवानंद(40 वर्षे). काही वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये साक्षीने तिच्या अभिनयाने चांगलीच ओळख निर्माण केली होती. पण बॉलिवूडमधील अंडरवर्ल्डच्या वाढत्या दबदब्याने घाबरलेल्या साक्षीने बॉलिवूडला रामराम करणे पसंत केले. साक्षीने कोणालाच तिचा पत्ताही सांगितला नाही. 
 
साक्षीने 1995 साली 'जन्म कुंडली' या चित्रपटाने डेब्यू केला होता. याशिवाय तिने 'पापा कहते हैं' (1996), 'जंजीर' (1998), 'क्रोध' (2000), 'आपको पहले भी कहीं देखा है' (2002), 'खलनायकों का खलनायक' (2002) यासारख्या चित्रपटातही काम केले होते. 'आपको पहले भी कहीं देखा है' चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. पण या चित्रपटानंतर तिच्या आयुष्यातील अंडरवर्ल्डच्या हस्तक्षेपाने ती इतकी घाबरली की बॉलिवूड सोडून निघून हेली. सध्या साक्षी साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, तिच्याविषयीच्या खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...