आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सोनमसह किल्ल्यात पोहोचला सलमान, 'प्रेम रतन धन पायो'साठी दिले शॉर्ट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर- बॉलिवूड स्टार सलमान खान बुधवारी (8 एप्रिल) डबोक एअरपोर्टहून चित्तौडगढ पोहोचला. चित्तौडमध्ये 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाच्या शूटिंग निमित्त सलमान येथे आला होता. शूटिंगसाठी अभिनेत्री सोनम कपूर सलमान आधी पोहोचली होती. दोघांनी चित्तौड किल्ल्यावर सिनेमाचे काही शॉट्स शूट करण्यात आले. यादरम्यान सल्लूचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. लोकांना सलमानच्या सिनेमाचे शूटिंग या किल्ल्यावर होणार असल्याचे माहित होताच येथे गर्दी जमली.
सोनम कपूरने या सिनेमासाठी यापूर्वी काही शॉर्ट्स दिले आहेत. स्वाइन फ्लूमधून पूर्णपणे बरी होऊन सोनमने सूरज बडजात्या दिग्दर्शित या सिनेमाचे शूटिंग पुन्हा सुरु केले. या सिनेमात सलमान खान आणि सोनम कपूर या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहेत. दोघांशिवाय नील नितीन मुकेश, स्वरा भास्कर, अरमान कोहली आणि संजय मिश्रासुध्दा सिनेमात महत्वाच्या भूमिकेत आहेत. 11 नोव्हेंबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान आणि सोनमची येथील शूटिंगवेळची छायाचित्रे...