आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#SalmanVerdict: सलमान अखेर सुटला, चाहत्यांनी कारला ठरवले दोषी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान, (खाली) टि्वटरवर #SalmanVerdictवर आलेल्या प्रतिक्रिया)
मुंबई- 2002 हिट अँड रन प्रकरणात सलमान खानची निर्दोष सुटका झाली आहे. दुसरीकडे #SalmanVerdict टि्वटरवर ट्रेंडिंगवर आले आहे. काही चाहत्यांनी सलमानला पाठिंबा दिला आहे तर काहींनी न्यायव्यवस्थेच्या निर्णयाला चुकीचे ठरवले आहे. इतकेच नव्हे, हिट अँड रन प्रकरणात सलमानच्या SUV कारलासुध्दा लोकांनी दोषी ठरवले आहे.
मुंबई हायकोर्टाने 13 वर्षे जूने हिट अँड रन प्रकरणातून सलमान खानची सुटका केली आहे. सलमानने सत्र न्यायालयाकडून मिळालेल्या पाच वर्षांच्या शिक्षेच्या विरोधात अपील केले होते. गुरुवारी (10 डिसेंबर) हायकोर्टाने निर्णय सांगितला. हायकोर्टाने सांगितले, 'खटला दाखल करणारे सलमानवरील कोणतेच आरोप सिध्द करू शकले नाही.' 2002मध्ये मुंबईमध्ये सलमानच्या कारने फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला होता.
सलमानने नुकतेच फेसबुक आणि टि्वटरवर पाठिंबा दिल्याने चाहत्यांचे, कुटुंबीयांचे आभार मानले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, #SalmanVerdictवर चाहत्यांनी शेअर केलेल्या प्रतिक्रिया... आणि सर्वात शेवटी वाचा, सलमानने मानले चाहत्यांचे आभार...
बातम्या आणखी आहेत...