आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'करिश्मा-करीना'ची आई आहे सलमानसोबत झळकलेली ही अॅक्ट्रेस, बॉलिवूडमध्ये ठरली फ्लॉप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 1991साली आलेल्या 'सनम बेवफा' या सिनेमातील लीड अॅक्ट्रेस चांदनी दीर्घ काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. सलमान खानसोबत डेब्यू करणा-या चांदनीने निवडक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले. पण येथे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात ती अपयशी ठरली. इंडस्ट्रीत अपयशी ठरुन देखील तिला बॉलिवूडविषयी एवढा जिव्हाळा आहे, की तिने तिच्या दोन्ही मुलींची नावे करिश्मा आणि करीना ही ठेवली. इतकेच नाही तर चांदनी हे तिचे खरे नाव नसून नवोदिता शर्मा हे खरे नाव आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिने खरे नाव सोडून स्वतःचे चांदनी हे नाव ठेवले. आता चांदनी यूएसमध्ये स्थायिक झाली असून येथील ऑरलॉडो शहरात डान्स क्लास चालवते. 

'हाहाकार' हा आहे चांदनीचा शेवटचा सिनेमा...
चांदनीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये 10 सिनेमांमध्ये काम केले. 'हिना' (1991), 'उमर 55 की दिल बचपन का' (1992), 'जान से प्यारा' (1992), '1942 : ए लव स्टोरी' (1993), 'जय किशन' (1994), 'इक्के पे इक्का' (1994), 'आजा समन' (1994), 'मि. आजाद' (1994), 'हाहाकार' (1996) ही तिच्या सिनेमांची नावे आहेत. सिनेमे फ्लॉप ठरु लागल्यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले. 1994 साली परदेशी तरुणासोबत लग्न थाटून ती ऑरलॉडो येथे स्थायिक झाली.

पुढील स्लाईड्सवर वाचा, चांदनीच्या प्रवासाविषयी...
बातम्या आणखी आहेत...