आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईतील शूटिंगनंतर मोरक्कोला जाणार सलमान-कॅटरीना जोडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खान आणि कॅटरीना कैफ  'टाइगर जिंदा है' चित्रपटाचे शूटिंग संपवून मुंबईला परतले होते. सध्या हे दोघे आपापला चित्रपट प्रमोट करण्यात बिझी आहेत. सलमान त्याचा आगामी चित्रपट 'ट्यूबलाइट'चे प्रमोशन करत आहे तर कतरिना रणबीरसोबत जग्गा जासूसचे प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या एक ते दोन आठवड्यात हे दोघे त्यांच्या आगामी शूटिंगसाठी मोरक्कोला रवाना होणार आहेत. सलमान अगोदर चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर तिथे पोहोचणार आहेत. नुकतेच अलीने ही माहिती ट्वीटरद्वारे शेअर केली आहे.  
त्यांनी ट्वीट केले की, "Back to packing bags, prep for Morocco schedule begins… @TigerZindaHai.
 
यासोबतच त्यांनी त्यांच्या रुमचा आणि बॅगचा फोटो शेअर केला आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अलीने शेअर केलेला फोटो..
बातम्या आणखी आहेत...