आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 10वा श्रीमंत अभिनेता आहे सलमान, निकालाचा ब्रँड इमेजवर होणार नाही परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलमान खान भारतीय सिनेसृष्टीमधील प्रमुख कलाकारांपैकी एक आहे. फोर्ब्सच्या रिपोर्ट्सनुसार 2014मध्ये सलमानने कमाईच्या बाबतीत शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनासुध्दा पछाडले आहे. मात्र मालमत्तेविषयी सांगायचे झाले तर सलमान अद्याप या दोनही स्टार्सच्या मागे आहे. एका दुस-या रिपोर्ट्सनुसार सलमान जगातील 10वा सर्वाधिक श्रीमंत अभिनेता आहे. जगातील टॉप 5 श्रीमंतांपैकी एक जेरी शेनफील्ड, शाहरुख खान, टॉम क्रूज, जॉनी डेपसह टेलर पेरी, सिलवेस्टर स्टेलॉन आणि अमिताभ बच्चन सामील आहेत.
पेरी, स्टेलॉन आणि अमिताभ यांची एकूण मालमत्ता जवळपास सारखीच आहे. शिवाय टॉम हँक्स, किनू रीव्स, व्हिल स्मिथ आणि लिओनार्डो डी कॅप्रियो यांचेसुध्दा Net Worth सलमानपेक्षा जास्त आहे. अनेक ट्रेन अॅनालिस्टचे मत आहेत, की सलमानला दोषी ठरूवून शिक्षा सुनावल्याचा त्याच्या ब्रँड इमेजवर सध्यातरी काहीच परिणाम होणार नाही. कारण त्याच्याकडे जामीन आणि इतर अनेक पर्याय आहेत. सिनेमा, जाहिरात आणि इतर साधनांतून त्याची होणारी कमाई कमी होण्याची साशंका खूप कमी आहे.
अशी होते बॉलिवूडच्या दबंगची कमाई-
सेलिब्रिटी मॅनेजमेंट प्रोफेशनल्सच्या रिपोर्ट्सनुसार सलमानच्या ब्रँड एंडोर्समेंटवर 45 कोटी रुपये लागले आहेत. त्याला ब्रँड एंडोर्समेंटकडून जवळपास 10 कोटींचे मानधन मिळते. काही वर्षांपासून तो 'बिग बॉस' हा रिअॅलिटी शोदेखील होस्ट करत आहे. मंधाना इंडस्ट्रीज लि. सोबत पार्टनरशिपमध्ये सलमानचा बीइंग ह्यूमन ब्रँडसुध्दा देश-परदेशात सामानांची विक्री करतो. याचा स्वत:चे एक ऑनलाइन स्टोअरसुध्दा आहे.
सलमानचे हे फाऊंडेशन भारतातील लोकांनासुध्दा हेल्थकेअर आणि प्रायमरी एज्युकेशनसाठी मदत करते. बीइंग ह्यूमन ब्रँडमधून मिळणारा पैसा सलमान गरजू लोकांसाठी खर्च करतो. मंधानाच्या ग्लोबल सेलमधून वर्षभर जवळपास 170 कोटी रुपयांची कमाई होते. त्यातील 10 टक्के कमाई रॉयल्टीच्या रुपात फाऊंडेशनला जाते. सलमानच्या सिनेमांविषयी सांगायचे झाले तर, त्याच्या 5 सिनेमांचे प्री-प्रॉडक्शनवर काम सुरु आहे. ऑनफ्लोअर सिनेमा 'बजरंगी भाईजान' आणि 'प्रेम रतन धन पायो'वर 200 कोटी रुपये लावण्यात आले आहेत. इतर प्रोजेक्ट्समध्ये शुद्धि, सुल्तान आणि नो एंट्री मे एंट्री हे सिनेमे सामील आहेत.
मागील काही वर्षांमध्ये सलमानचे जवळपास सर्व सिनेमांनी 100 ते 200 कोटींची कमाई केली आहे. तो प्रत्येक सिनेमासाठी 50 कोटी रुपये घेतो. शिवाय होर्डिंग्सवर सलमानच्या सिनेमाचे पोस्टर्स आणि वेबसाइटवर त्याच्या जाहितीचेसुध्दा वेगळी कमाई आहे.
काय आहे ट्रेड अॅनालिस्ट आणि एक्सपर्टचे मत-
हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा झाली असली तरी ब्रँड सलमानची लोकप्रियता कायम राहिल. याविषयी जास्तित जास्त ट्रेड अॅनालिस्ट आणि एक्सपर्ट यांच्यात चिंतेची कोणतीच बाब दिसून येत नाही.
अमोद मेहरा- इंडस्ट्री एक्सपर्ट
सलमानला शिक्षा झाल्यास बॉलिवूडमध्ये कोणत्याच गोष्टीचे भिती नाहीये. सर्वांना ठाऊक आहे, की सलमानकडे जामीनासारखा दुसरा पर्याय आहे.
विनोद मिरानी- ट्रेड एक्सपर्ट
सलमानने हायकोर्टात अर्ज केला आहे, कोणत्याच व्यक्तीला तुरुंगात जाण्याची इच्छा नसते.
कोमल नाहटा- ट्रेड अॅनालिस्ट
इंडस्ट्रीमध्ये कोटी रुपये सलमानवर लागले होते त्यामुळे त्याच्या निकालाने सर्वांचा चिंतेत टाकले होते.
अनंत रंगास्वामी- स्टोरीबोर्ड एडिटर
सलमानच्या लोकप्रियतेवर काहीच परिणान होणार नाही. काही नामांकित मल्टीनॅशनल ब्रँड्स आणि भारतीय ब्रँड्स दोषीसोबत जोडणे पसंत करणार नाहीत. परंतु लोकल एंडोर्समेंट्सवर याचा काहीच फरक पडणार नाही.
मनीषा मंधाना- मॅनेजिंग डायरेक्टर, मंधाना
आमच्या प्रॉडक्ट्सच्या विक्रिवर अद्याप काहीच फरक पडलेला नाहीये. आमचा व्यवसाय मागील तीन वर्षांमध्ये तीन टक्क्यांनी वाढला. अपेक्षा आहे, की पुढेही असाच नफा होवो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा वर्ल्ड टॉप-5 श्रीमंत अभिनेत्यांविषयी...