आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंड लुलियासोबत सलमानचे कडाक्याचे भांडण, वाचा का घडले असे?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सलमान खान नेहमीच त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या भांडणाने चर्चेत असतो. आता सध्या त्याची सो-कॉल्ड गर्लफ्रेंड लुलियासोबत त्याचे भांडण झाल्याचे वृत्त आहे. याचे कारण सलमानचे 'दबंग टूर' सांगितले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लुलियाला 'दबंग टूर' मध्ये गाणे गायचे होते. पण सलमानने तिला तसे करु दिले नाही. त्यामुळे टूर सुरु होण्याच्या काही दिवसांपासून ती यापासून दूर झाली. लुलिया त्यामुळे नाराज झाली आहे.
 
टूरमध्ये सलमानचे अनेक मित्र झाले सहभागी
 
- टूरवर सलमानसोबत त्याची आई सुशीला चरक (सलमा), बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्माही आहे.
- याव्यतिरीक्त यात बिपाशा बासू, डेजी शाह आणि मनीष पॉलही आहे.
- सलमानचे 'दबंग टूर' हाँगकाँग येथे 16 एप्रिलपासून सुरु झाले. यात अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांनी परफॉर्मन्स केला. 
- यानंतर सलमानच्या टीमने ऑकलँड, न्यूझीलंडमध्ये परफॉर्म केले. 22 एप्रिलला मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे शेवटचे परफॉर्मन्स केले. 
 
हिमेशसोबत लुलियाने केले होते सिंगींग..

- लुलियाने 2016 साली प्रदर्शित झालेल्या 'आपसे मौसिकी' या म्यूझिक अल्बममध्ये गाणे गायले आहे.
- या अल्बममध्ये तिने 'एव्हरी नाईट अँड डे' हे गाणे गायले.
 
मुळची रोमानियाची आहे लुलिया वंतूर 

- लुलिया वंतूर मुळची रोमानियाची राहणारी आहे जी मॉडेल आणि टी.व्ही होस्ट आहे
- 2006 साली लुलियाने PRO टी.व्ही साठी मॉर्निंग शो होस्ट केला. 
- ती मॉर्निंग न्यूज वाचत असे आणि एका मोठ्या कार्यक्रमाचे को - होस्टींगही करत असे
- लुलिया, स्टीफन बनीकासोबत डान्स परफॉर्मन्सही करत आहे. 
- लुलियाने 2014 साली ओ तेरी चित्रपटात आयटम नंबरही केले आहे. 
- लुलिया नेहमीच सलमानच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसते. सलमान अनेकदा लुलियाला पार्टी-समारंभामध्ये घेऊन जातो. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये पाहा सलमानच्या 'दबंग टूर' चे फोटोज्...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 

 
बातम्या आणखी आहेत...