आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा बालपणीपासून ते आतापर्यंत सलमानच्या खासगी आयुष्यातील निवडक PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान)
मुंबई- 13 वर्षे जूने 'हिट अँड रन' प्रकरणात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु हायकोर्टाकडून त्याला दिसाला मिळाला आहे. सलमानला दोन दिवसांची अंतरिम जामीन मिळाला आहे. 49 वर्षीय सलमान खानचा जन्म 27 डिसेंबर 1965 रोजी इंदोरमध्ये झाला. त्याचे मूळ नाव अब्दुल राशिद सलीम सलमान खान आहे. पाच बहीण-भावडांमध्ये सलमान (सलमान, अरबाज, सोहेल, अलविरा आणि अर्पिता) सर्वात मोठा आहे.
सलमानच्या कुटुंबीयांविषयी सांगायचे झाले तर वडील सलीम खान बॉलिवूडचे प्रसिध्द लेखक आहेत, आई सुशीला चरक (सलमा) हाऊस वाइफ आहेत. सलमानची दुसरी आई हेलन गतकाळातील प्रसिध्द आयटम डान्सर आहेत.
मुंबईच्या वांद्रा स्थित St. Stanislaus High Schoolमधून शालेय शिक्षण पूर्ण करणारा सलमान सिंधीया कॉलेज ग्वालियरचासुध्दा विद्यार्थी होता. मात्र त्याचे शिक्षण अर्धवट सोडून अभिनया क्षेत्रात पाऊल ठेवले.
1988मध्ये जे के बिराही यांच्या 'बीवी हो तो ऐसी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. मात्र 1989 मध्ये त्याने पहिल्यांदा सूजर बडजात्या यांच्या 'मैने प्यार किया' सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. सलमानने आतापर्यंत जवळपास 74 सिनेमांत अभिनेता म्हणून काम करणारा सलमान सध्या 'प्रेम रतन धन पायो' आणि 'बजरंगी भाईजान'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
सलमानची प्रोफेशन लाइफ सर्वजण पडद्यावर सर्वांनी पाहिली आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला त्याचे बालपण दाखवणार आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानचे बालपणीपासून ते आतापर्यंतचे PHOTOS...