नवी दिल्ली- हिट अँड रन प्रकरणात सलमानला दोषी ठरवून कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सलमानच्या शिक्षेमुळे इंडस्ट्री आणि जाहिरात इंडस्ट्रीला मात्र मोठा धक्का बसला आहे. या इंडस्ट्रीने सलमानवर मोठी रक्कम लावलेली आहे. एन्डोर्समेंट आणि सिनेमा निर्मात्यांनीसुध्दा एकूण 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम त्याच्यावर लावलेली आहे.
अलीकडेच सलमानने स्टार सॅटेलाइटसोबतसुध्दा 500 कोटींचा करार केला आहे.
आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून
सलमान खानच्या कमाईविषयी सांगत आहोत.
एका दिवसात कमावतो 6-7 कोटी-
जाहिरात मार्केटमध्ये सलमानची ब्रँड व्हॅल्यू 318 कोटी रुपये आहे. तो एका दिवसात जाहिरातीसाठी 6-7 कोटी रुपये घेतो. त्याच्याकडे सध्या थप्स अप, सुजुकी, रिलॅक्सी फुटविअर, रिव्हायटल, यात्रा डॉट कॉम, व्हिल डिक्सी स्कॉट इनरविअरसारख्या मोठ्या जाहिराती आहेत. बातमी आहे, की तो लवकरच हेल्थ सप्लीमेंटसाठी आठ कोटी रुपयांची जाहिरात करणार होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोठून-कोठून होते सलमानची कमाई...