आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Has A UNIQUE Name For His Girlfriend Iulia Vantur

Buzz: तुम्हाला माहितीये का \'गर्लफ्रेंड\' लुलियाला प्रेमाने काय म्हणतो सलमान?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
​ फाइल फोटो : सलमान खान आणि लुलिया वेंचूर - Divya Marathi
​ फाइल फोटो : सलमान खान आणि लुलिया वेंचूर
मुंबई - सलमान खान कथित गर्लफ्रेंड लुलिया वेंचूरला प्रेमाने काय म्हणतो हे कदाचित कुणालाच माहिती नाहीये. मात्र नुकतीच एका माहिती समोर आली आहे, त्यात खुलासा झाला आहे, की सलमान लुलियाला प्रेमाने 'यू' म्हणतो. ही माहिती सलमानशी निगडीत एका सूत्राने दिली आहे. काही रिपोर्ट्सने तर संकेत दिले आहेत, की लुलिया सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे आणि फोटोग्राफर्सपासून वाचण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा आधार घेत आहे.
फॅमिली प्रोग्रामपासून 'बिग बॉस'च्या सेटपर्यंत...
- सलमान आणि लुलियाचे अफेअर दिर्घकाळापासून चर्चेत आहे.
- लुलियाला नेहमीच खान कुटुंबीयांच्या फॅमिली प्रोग्राम्समध्ये पाहिल्या जाते.
- ती कधी सलमानच्या फार्महाऊसवर प्रायव्हेट पार्टी तर कधी हैदराबादमध्ये झालेल्या अर्पिताच्या लग्नात दिसली.
- मागील वर्षी सलमानच्या 50व्या बर्थडे आणि न्यू ईअर सेलिब्रेशनवेळीसुध्दा लुलिया सलमान खानच्या कुटुंबीयांसोबत दिसली होती.
- शिवाय, 'बिग बॉस'च्या सेटवर सलमानच्या प्रायव्होज कॉटेजमध्येसुध्दा लुलिया स्पॉट झाली होती.
- इतकेच नव्हे, मागील दिवसांत मीडियामध्ये चर्चा होती, की सलमानने लुलियाला ग्रे रंगाची एक लग्झरी कार गिफ्ट केली आहे.
कुठली आहे लुलिया...
- लुलिया वेंचूर रोमानियाची रहिवासी आहे. ती मॉडेल तसेच टीव्ही होस्टसुध्दा आहे.
- 2006मध्ये लुलियाने टीव्हीत करिअर करण्यास सुरुवात केली. तिने PRO टीव्हीसाठी मॉर्निंग न्यूज शो होस्ट केला होता.
- ती आठवड्याच्या अखेर मॉर्निंग न्यूज वाचत होती आणि वर्षातून एकदा कार्यक्रमात को-होस्टसुध्दा करत होती.
- लुलियाने स्टीफन बनीकासोबत डान्सिंग प्रोग्राममध्येसुध्दा केले आहेत.
- ती स्पोर्ट्सटची समर्थक आहे. ती लहान असताना व्हॉलीबॉल खेळत होती. ती टेनिस आणि बास्केटबॉलदेखील खेळायची.
- तिने 2014मध्ये 'ओ तेरी' या बॉलिवूड सिनेमात आयटम नंबर केला होता. हा सिनेमा सलमानचा भावोजी अतुल अग्निहोत्रीने निर्मित केला होता.
विवाहित आहे लुलिया...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुलियाचे एक लग्न झाले आहे.
- सूत्रांच्या सांगण्यानुसार, तिने रोमच्या मारिअस मोगासोबत लग्न केले. मारिअस मोगा गीतकार, गायक आणि निर्माता आहे. तो यूरोपमध्ये राहतो. लुलिया आणि मारिअसचे लग्न 7 ऑगस्ट 2012मध्ये झाले होते.
- दोघांचे दिर्घकाळापासून नाते होते. यांच्या रोमान्स बातम्या शहरातील वर्तमानपत्रात हेडलाइन असायच्या.
- मात्र त्यांनी घटस्फोट घेतला, की नाही हे अद्याप समोर आलेले नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लुलियाचे सलमान सोबतचे फोटो...