आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan In Udaipur For Prem Ratan Dhan Payo Shooting

सलमानने उदयपूरमध्ये केली बोटींग, माकडांना खाऊ घातले दाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर- सलमान खान सध्या उदयपूरमध्ये आहे. आपल्या सिनेमाच्या सलमान शूटिंगसाठी हॉटेल लीलामधून बोटींग करून शिकारबाडीला पोहोचला. सलमान शुक्रवारी (10 एप्रिल) सकाळी 11 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रेम रतन धन पायोची शूटिंगमध्ये बिझी होता.
शिकारबाडीमध्ये पोलो मॅचचा सीन होता, त्यामध्ये उदयपूरचे खेळाडू आणि तरुण खेळताना दिसणार आहे. या सीनसोबत सलमान खान आणि सोनम कपूर गप्पा मारताना दिसले. त्यानंतर क्लाब हाऊसमध्ये सलमान, सोनमसोबत अनुपम खेर आणि नील नितीन मुकेशचे स्वागताचा सीन चित्रीत करण्यात आला. शनिवारी (11 एप्रिल) जगमंदिरमध्ये सिनेमाचे एक गाणे चित्रीत करण्यात येणार आहे.
रस्त्यात सलमानने माकडांना दाणे खाऊ घालते. सलमानला बोटींग करताना पाहून सर्वजण सलमान-सलमान म्हणून चिअर करत होते. सलमाननेसुध्दा त्यांना हात हलवून अभिवादन केले. गुरुवारी (9 एप्रिल) संध्याकाळी सोनम आणि यूनीट चित्तौडहून उदयपूरला पोहोचले होते. अनुपम खेर आणि नील नितीन मुकेश मुंबईला गेला होता. चित्तौडीहून हॉटेल लीलाला आल्यानंतर सलमानने रात्री 9 वाजता तीन तास जिममध्ये घालवले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाचे On Location फोटो...