आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ही आहे सुनील शेट्टीची मुलगी, सलमान करतोय बॉलिवूडमध्ये लाँच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अथिया शेट्टी)
मुंबईःआणखी एक स्टार डॉटर बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ही आहे अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी. 22 वर्षीय अथिया 'हीरो' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. 25 सप्टेंबर 2015 रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
सुभाष घई यांच्या 1983 मध्ये रिलीज झालेल्या 'हीरो' या सिनेमाचा रिमेक आहे. निखिल आडवाणी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अथियासोबत आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोली झळकणार आहे. सूरजचासुद्धा हा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे.
सलमान करतोय दोघांना लाँच...
अथियाच्या बॉलिवूड पदार्पणामागे अभिनेता सलमान खानचा वाटा आहे. 'हीरो' या सिनेमाचा तो निर्माता आहे. सलमान खान प्रॉडक्शनच्या बॅनरमध्ये हा सिनेमा तयार होतोय. सुनील शेट्टीच्या मुलीने त्याच्या सिनेमात काम करावे, ही सलमानचीच इच्छा होती.
सलमानने सुनीलशी बातचित करुन अथियाला सिनेमासाठी साइन केले. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून अथियाच्या कामाने सलमान आनंदी आहे. अलीकडेच अथियासोबत सलमानने एक फोटोशूटसुद्धा केले. त्याची बरीच चर्चा झाली. अथियाप्रमाणेच सलमान सूरज पंचोलीलासुद्धा बॉलिवूडमध्ये लाँच करतोय.
अथियाने न्यूयॉर्कमध्ये गिरवले फिल्ममेकिंगचे धडे...
अथियाने अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून 'फिल्मेकिंग अँड लिबरल आर्ट्स' हा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. वयाच्या 18 व्या वर्षी हा कोर्स पूर्ण करुन अथिया मुंबईत परतली.
सोशल नेटवर्किंग साइट्सवर आहे अॅक्टिव...
सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्याने अथिया सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव झाली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःची बरीच छायाचित्रे अपलोड केली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अथियाने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेली छायाचित्रे...